Mumbai News, 25 June : माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी मंगळवारी (ता.25 जून) रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सुर्यकांता पाटील यांनी शनिवारी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. भाजपला रामराम ठोकल्यानंतर त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.
अशातच आज मंगळवारी (ता.25 जून) सूर्यकांता पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थित मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश केला. पक्षप्रवेशाच्या निमित्ताने शरद पवारांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. (Suryakanta Patil NCP SP Entry)
यावेळी बोलताना शरद पवारांनी (Sharad Pawar) पाटील यांची विचारधारा गांधी नेहरु यांची असल्याचं सांगितलं. तसंच सूर्यकांता पाटील यांनी एक महत्वाचा राजकीय निर्णय घेतला आहे, याचं मी स्वागत करतो, असं पवार म्हणाले. तर मी स्वत: माझे परतीचे दोर कापले असून, माझ्या अंतापर्यंत आपल्यासोबत असेन, अशा शब्द पाटील यांनी पवारांना दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी पाटील या स्वातंत्र्य लढ्यातील कुटुंबातून येतात असंही सांगितलं. पवार म्हणाले, "सूर्यकांताताई या स्वातंत्र्य लढ्यातील कुटुंबातून येतात. त्यांना केंद्र सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा संसदीय कामकाजाचा सहभाग हा महत्वाचा टप्पा आहे. तसंच त्यांनी सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधीत्व केलं आहे."
तसंच समाजकारण राजकारणात सूर्यकांताताईंच्या जीवनाचा मोठा कालखंड गेला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय अतिशय योग्यवेळी केला असल्याचंही पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावेळी सूर्यकांता पाटील यांनी, माझ्या आयुष्याचा सर्वाधिक काळ साहेबांसोबत गेल्याचं म्हटलं. तर भविष्यातील लढाईसाठी मी तुमच्यासोबत आले आहे. देशासाठी अनेक लोक हुतात्मे झाले. या युद्धाच्या प्रसंगी मी आपल्यासोबत आहे. परतीचे दोर मी स्वत: कापले असून मी माझ्या अंतापर्यंत आपल्यासोबत असेन,असा शब्द पाटील यांनी पवारांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.