Mahayuti : दादांचे आमदार असलेल्या जागांवर शिंदेंचा दावा, महायुतीत जागा वाटपाचा पेच वाढणार?

Mahayuti Pune Assembly Seat Sharing : प्रत्येक मतदारसंघांमध्ये महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इच्छुक उमेदवार आहेत. अशात जागा एका पक्षाला गेल्यास इतर दोन पक्षातील इच्छुक नाराज होणार.
Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News , 25 June : लोकसभा निवडणूक संपताच सर्व राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणूक महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्रित लढण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा मोठा जटिल प्रश्न महायुतीतील नेत्यांपुढे असणार आहे.

प्रत्येक मतदारसंघांमध्ये महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इच्छुक उमेदवार आहेत. अशात जागा एका पक्षाला गेल्यास इतर दोन पक्षातील इच्छुक नाराज होणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

अद्याप तरी महायुतीमध्ये (Mahayuti) जागा वाटपाबाबतची अधिकृत चर्चा सुरू झालेली नाही. मात्र स्थानिक नेत्यांकडून जागांबाबत दावे करण्यात येत आहेत. पुणे शहरातील महायुतीतील परिस्थिती पाहिली तर भाजप (BJP) शहरातील आठ जागा लढण्यास इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीचे सद्यस्थितीला वडगाव शेरी आणि हडपसरमध्ये आमदार आहेत.

मात्र शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडून आगामी निवडणुकीसाठी तीन जागांची मागणी करण्यात आली आहे. तर रिपाईने देखील एक जागेवर निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच मनसे महायुतीत गेल्यास मनसेही एका जागेवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

सध्याचं चित्र पाहिलं तर शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तर एका ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे.

मागील निवडणुकीमध्ये भाजपने आठही जागा लढल्या होत्या त्यांना दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर कसब्याची जागा ही पोटनिवडणुकीत गमवावी लागली.

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने पुण्यातील आठ जागा लढल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत भाजप मित्र पक्षांसाठी किती जागांचा त्याग करणार हे पहावे लागेल.

Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Ujjwal Nikam: ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर आरोपीचा आक्षेप;...ते आता भाजपचे नेते

शिवसेना शिंदे गटाने शहरातील तीन जागांसाठी आग्रह धरला आहे. यामध्ये हडपसर, वडगाव शेरी आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये हडपसर आणि वडगाव शेरी येथे अजित पवार गटाचे आमदार आहेत. आणि नेमक्या त्याच जागांवर शिंदेंच्या सेनेने दावा केला आहे.

हडपसरमधून शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख नाना भानगिरे हे इच्छुक आहेत. तर खडकवासला विधानसभा मतदार संघामधून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे हे देखील इच्छुक आहेत. या दोन्ही जागांसाठी शिंदे गट जोर लावणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Sanjay Raut : कंगनाच्या 'डिमांड'नं संजय राऊतांनीही डोक्याला हात लावला; नेमकं काय घडलं?

लोकसभा निवडणुकीमध्ये एकही जागा न मिळालेल्या रिपाईला देखील विधानसभा निवडणुकीमध्ये दहा जागा हव्या आहेत. तर पुण्यातील कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी रिपाई इच्छुक आहे. त्यामुळे जागा वाटपावरून महायुतीमध्ये मोठा संघर्ष भेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com