Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Special Executive Officer : फडणवीसांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याच्या नावाने फसवणूक; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Ganesh Thombare

Mumbai News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली. मात्र, काही तासांतच पोलिसांकडून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या.

ऊर्जा खात्यातून फडणवीसांचे विशेष कार्यकारी अधिकारी यांचा बोगस ई-मेल तयार करून काही अधिकाऱ्यांना बदलीचे ई-मेल पाठवण्यात आले होते. मात्र, ई-मेल बोगस असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत आरोपीला अटक केली.

नेमकं प्रकरण काय ?

देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विद्याधर महाले यांच्या नावाचा गैरवापर करत बोगस ई-मेल तयार करून ऊर्जा विभागातल्या काही अधिकाऱ्यांच्या बदलीचे ई-मेल पाठवण्यात आले. ई-मेलमध्ये बदलीबाबत नोटीस देण्यात आली होती. विशेष म्हणजे या नोटिशीवर फडणवीसांची सही आणि खोटे शिक्केही वापरण्यात आले.

हा प्रकार लक्षात येताच सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाची सूत्रे फिरवली. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. मोहम्मद इलियास असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा सांगली जिल्ह्यातील मिरजचा आहे. तसेच तो खासगी कंत्राटदार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी हा उच्चशिक्षित आहे. पण आरोपीने थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचा बनावट ई-मेल बनवत आणि सह्या तसेच खोट्या शिक्क्याचा वापर करत फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, यामध्ये अधिकाऱ्यांचा सहभाग तर नाही ना? यात पैशांचा व्यवहार झालाय का ? अशा सर्व बाजूंनी सायबर सेल आता चौकशी करणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT