
New Delhi News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि पक्ष चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे. गुरुवारी 70 लोकांना माझ्या नावाचा प्रस्ताव दिला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला. पक्षाच्या अध्यक्षपदावर माझी निवड योग्य नाही म्हणता. मात्र, त्या पत्रावर तुमच्याच सह्या आहेत, असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विस्तारित कार्य समितीची गुरुवारी दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यानंतर पवार म्हणाले, पक्षाचे चिन्ह त्यांना मिळेल असा ते दावा करत आहेत. निवडणूक आयोगाचा निर्णय काही आला तरी चिंता करण्याची गरज नाही. पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णयही आपल्याच बाजूने लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशाचे राजकारण बदलत आहे. देशातील अनेक राज्यांत भाजपचे सरकार नाही. काही राज्यांतील विरोधी पक्षांची सरकारे पाडून भाजपने सत्ता स्थापन केली आहे. आता लोकसभेच्या निवडणुका आहेत. भाजपने ज्यांच्यावर आरोप केले, त्यांना सोबत घेतले आहे. त्यामुळे भाजपने (BJP) आता त्यांच्या पक्षाचे कमळ हे चिन्ह बदलावे व वॉशिंग मशिन घ्यावे, असा हल्लाबोल पवार यांनी केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीसंदर्भात शुक्रवारी 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. शुक्रवारी दुपारी 3 वाजता राष्ट्रवादी प्रकरणाची सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी युक्तिवाद करणार आहेत. शरद पवार यांच्या वतीने तब्बल आठ ते नऊ हजार शपथपत्र दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.