French President Emanual Macron Jogging At Mumbai Roads : फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे सध्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. काल भारत-फ्रान्स यांच्यात मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत मुंबईतील लोकभवन इथं २१ करारांवर सह्या करण्यात आल्या. या करारांमुळं मॅक्रॉ हे काल चर्चेत होतेच पण आज ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याच कारणंही भन्नाट आहे. मुंबईतल्या रस्त्यांवर सकाळी मॅक्रॉ हे जॉगिंग करताना दिसून आले आहेत. परदेश दौऱ्यावर असतानाही आपला व्यायामाचा हा शिरस्ता त्यांनी मोडलेला नाही. त्यामुळं त्यांनी मुंबईकरांची मनं जिंकली.
मुंबईतल्या रस्त्यांवर कुठल्याही विशेष सुरक्षेशिवाय फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षांचं जॉगिंग करणं ही एक प्रेरणादायी कृती असल्याचंही बोललं जात आहे. कारण कोणत्याही प्रभावशाली व्यक्तीनं समाजावर चांगल्या कृतीतून प्रभाव टाकणं हे चांगलं असतं कारण लोक त्याचं अनुकरण करतात. त्याअर्थानं मॉक्रॉ यांचा मुंबईकरांसाठी सकाळी लवकर उठून व्यायाम करा, जॉगिंग करा, मॉर्निंग वॉक करा हा संदेश आपोआपच पोहोचला आहे. हा व्हिडिओ कालच्या सकाळचा आहे, तो सध्या व्हायरल झाला आहे.
शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी मॅक्रॉ यांचा हा जॉगिंग करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना ते म्हणतात, मुंबईच्या रस्त्यांवर सकाळी सकाळी जॉगिंग करताना फ्रेन्च राष्ट्रपती मॅक्रॉ. फिट राहण्यासाठी अशा प्रकारे नियमितता अंगी बाणणं गरजेचं आहे. निरुपम यांच्या या ट्विटला २ हजारांहून अधिक युजर्सनं लाईक केलं असून २०० युजर्सनं रिट्विट केलं आहे. यावर अनेक कमेंट्सही आल्या आहेत. त्यात एक युजर उपरोधकपणे म्हणतो की, मुंबईची हवा किती प्रदुषित आहे हे कदाचित मॅक्रॉ यांनी तपासलं नसेल. दुसरा एक युजर म्हणतो की, आपल्याकडं एखादा आमदारही बॉडीगार्ड घेऊन फिरत असतो. तर आणखी एक युजरनं म्हटलं की, जर आपल्याकडं एखाद्या किरकोळ नेत्यानं असं काही केलं तर त्याच्यासोबत पळणारी पोलीस सिक्युरिटी देखील पळत असतात आणि आपली प्रकृती राखत असतात.
दरम्यान, मोदी-मॅक्रॉ यांच्यामध्ये काल संरक्षण, तंत्रज्ञान, सागरी, हवाई अशा चार क्षेत्रात मिळून २१ करार करण्यात आले. जगावर अनिश्चिततेचं सावट असताना फ्रान्स-भारत भागीदारीमुळं यात स्थैर्य निर्माण होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तर मेक इन इंडियाचे आम्ही विश्वासू मित्र आहोत असं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉ यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.