Police Crime: धक्कादायक! पोलिसांच्या तिजोरीवर दरोडा, कोट्यवधींची अफरातफर, उपनिरीक्षक बेपत्ता

Petrol Pump Fraud PSI : पोलिसांच्या ताब्यात असलेल्या पेट्रोलपंपावर तब्बल एक कोटी 33 लाख रुपयांची अफरातफर झाल्याचे समोर आले आहे.
 Police Crime News
Police Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Police News: राज्यभर गुन्हे वाढत आहेत. या गुन्ह्यांना लगाम घालण्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेवर असते. मात्र आता पोलीस यंत्रणेची तिजोरी ही सुरक्षित नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

जळगाव पोलीस यंत्रणेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिस वाहनांसाठी पेट्रोल भरण्यासाठी असलेल्या पोलिसांच्याच ताब्यातील पेट्रोल पंपावर कोट्यवधींची अफरातफर झाली आहे. पोलीस उपनिरीक्षकाने त्याच्या ताब्यात असलेल्या या पेट्रोल पंपाचे 1.33 कोटी रुपये हडप केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात पोलीस कल्याण विभागाचे प्रमुख संदीप पाटील यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जळगाव पोलिसांमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनसुार, शहरातील भास्कर मार्केट येथील पोलिसांच्या पेट्रोल पंपातील व्यवहार ७ एप्रिल २५ ते 9 फेब्रुवारी २०२६ या कालावधीत गैरव्यवहार झाला होता.त्यमामध्ये ४.९३ कोटींची पेट्रोल आणि डिझेलची विक्री झाली. प्रत्यक्षात ३.५९ कोटी रुपये जमा करण्यात आले.१.३३ कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला. या पेट्रोल पंपाची जबाबदारी पोलिस उपनिरीक्षक वाघ यांच्याकडे देण्यात आली होती.

तपासणीत हा गैरप्रकार उघड झाल्याने पोलीस यंत्रणेला धक्का बसला. दोन दिवसांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक वाघ यांचा मुलगा शेखर वाघ यांनी पोलिसांशी संपर्क करून वडील बेपत्ता झाल्याचे सांगितले होते.

उपनिरीक्षक वाघ यांनी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात पेट्रोल पंपाच्या पैशांमध्ये अफरातफर झाल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून नुकतीच या पेट्रोल पंपाचे लेखा परीक्षण करण्यात आले होते. त्याच्या अहवालात आर्थिक अफरातफर झाल्याची कुठेही नोंद नव्हती. त्यामुळे यंत्रणेतही पाणी मुरत होते, अशी चर्चा सुरू आहे.

 Police Crime News
Gram Panchayat elections 2026 : 14 हजार ग्रामपंचायतींवर प्रशासक कशासाठी? निवडणुकीसाठी अडचण काय? हायकोर्टाची फडणवीस सरकारला विचारणा

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक वाघ गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी माहिती घेऊन पथके पाठवली आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ रेड्डी यांनी याबाबत गंभीर दखल घेतली आहे.

पोलिसांची तिजोरी सुरक्षीत नाही

गुन्हे नियंत्रणात ठेवणे आणि गैरप्रकार रोखणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. मात्र आता जळगावच्या पोलीस दलात घडलेल्या या प्रकाराने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांचीच तिजोरी सुरक्षित राहिलेली नाही. यंत्रणेतील गोंधळ उघड झाला आहे. हा सर्व प्रकार सुरू असताना प्रशासनाकडून डोळेझाक करण्यात आली की उपनिरीक्षक वाघ यांना संरक्षण देण्यात आले होते असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

 Police Crime News
Industrialist extortion case : मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश, ‘कायद्याने ठोकून काढा’; अरुण गवळीच्या पंटरची पहिली विकेट, MIDC मधील खंडणी प्रकरण तापणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com