Mumbai Political News : शिवसेना फुटल्यानंतर माजी खासदार गजानन कीर्तीकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या Eknath Shinde गटात जाणे पसंत केले. मात्र त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची साथ देण्यावर ठाम राहिले. त्याचे फळ त्यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारीच्या रुपाने मिळाले.
विरोधी गटाकडून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर गजानन कीर्तीकरांची मोठी कोंडी झाली. त्यातून त्यांनी शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या बाजूने प्रचार केला ना आपला मुलगा विरोधी गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या बाजूने रिंगणात उतरले. परिणामी शिंदे गटात जाऊनही एकटा पडल्याची भावना गजानन कीर्तीकरांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली.
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी (ता. 20) पार पडली. यात मुंबईतील सहा जागांचा समावेश होता. त्यात उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. यात शिंदे गटात गेलेले माजी खासदार गजानन कीर्तीकर Gajanan Kirtikar यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांनी ठाकरे गटाकडून रिंगणात होते. तर त्यांच्याविरोधात शिंदे गटाचे रवींद्र वायकरांनी टशन दिली. दोन्ही शिवसेनेचे शिलेदार आमने सामने असल्याने या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष आहे. ही निवडणूक पार पडताच शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तीकरांनी आपल्या मुलासाठी काम करता आले नसल्याची खंत व्यक्त केली.
गजानन कीर्तीकर म्हणाले, अमोलला Amol Kirtikar बोट धरून शिवसेनेत आणले. सर्व ठिकाणी त्याच्या पाठीशी उभा राहिलो. त्याच्या सुदैवाने लोकसभा लढवण्याची त्याला संधी मिळाली. ना नगरसेवक, ना आमदार त्याने थेट खासदारकीची निवडणूक लढवली. याचा आनंद आहे. मात्र त्याच्या या आयुष्याला कलाटणी देण्याच्या वेळी मी त्याच्यासोबत नव्हतो. त्यांच्या टर्निंग पॉइंटला त्यांच्यासोबत नव्हतो,याची खंत कायम असेल, असे कीर्तीकरांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून गजानन कीर्तीकर दोन वेळा खासदार होते. त्यांच्याऐवजी शिंदे गटातून रवींद्र वायकरांना Ravindra Waikar संधी देण्यात आली. यावर ते म्हणाले, ही निवडणूक तुल्यबळ झालेली आहे. सध्या येथून कोण जिंकेल हे स्पष्ट सांगता येत नाही. माझ्या संपर्काचा वायकरांना फायदा व्हायला हवा. निवडणुकीत मात्र मी ना अमोलच्या विरोधात काम केले ना वायकरांच्या बाजूने काम केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी Prakash Ambedkar ही निवडणूक झाली की अमोल कीर्तीकर शिंदे गटात जातील, असा वेळोवेळी दावा केला आहे. यावर गजानन कीर्तीकर म्हणाले, अमोलला शिंदे गटात यायचे असेल तर तो आतापर्यंत आला असता. त्याला नेण्यासाठी मी, मुख्यमंत्री शिंदेंनी प्रयत्न केले होते. त्याने मला तुम्ही जात असाल तर जा, मला नाही यायचे अशी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.