Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama

Sharad Pawar Vs Ajit Pawar : जे सोडून गेले त्यांच्याबाबत आमचं ठरलंय...; अनिल देशमुखांनी एकदम स्पष्टच केलंय

Anil Deshmukh : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटात गेलेले बजरंग सोनवणे आणि निलेश लंके यांनी पुन्हा शरद पवार गटात परतले आहेत.

Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत अजित पवार गट भाजपसोबत राज्याच्या सत्तेत सहभागी झाला. या फुटीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना ४० आमदार, राज्यातील बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्ते मिळाले. निवडणूक आयोगाने पक्ष, चिन्ह अजित पवारांना दिले. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवारांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात होते. मात्र पवारांनी पुन्हा सर्व गणित जुळवत लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली. आता सोडून गेलेल्यांसाठी परतीचे दरवाजे बंद केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांनी Ajit Pawar साथ सोडल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंब शरद पवारांसोबत उभे राहिले. यात अजित पवारांचे धकटे श्रीनिवास पवार यांचे कुटुंबानेही पवारांची साथ दिली. श्रीनिवास पवारांनी अजित पवारांना जाहीरपणे खडसावले. यावर अजित पवारांनीही पवार सोबत नसले तर बारामतीची जनताच माझे कुटुंब असल्याची साद घातली होती. दोन्ही गटाकडून सुरुवातीस थेट आरोप केले जात नसले तरी नंतर मात्र त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या.

आता नुकतीच राज्यातील 48 जागांसाठी लोकसभेचे मतदान पाच टप्प्यांत पार पडले. यात शरद पवार Sharad Pawar गटाने 10 तर अजित पवार गटाने चार जागा लढवल्या. यातील बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष संपूर्ण देशाने पाहिला. त्यानंतर शरद पवारांनी बारामतीच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे आरोप केले. त्यामुळे दोन्ही गटातील वाद विकोपाला गेल्याचे दिसून आले.

Sharad Pawar, Ajit Pawar
Pune Porsche Accident News: कल्याणीनगर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी धमकावलं? पोलिस आयुक्तांनी दिलं उत्तर

दरम्यान, वेळ पडल्यानंतर अजित पवारांनी मदत मागितली तर हात देणार का, असा प्रश्न एका मुलाखतीत शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना पवारांनी, अजितदादांना मी चांगलेच ओळखतो, ते कुणाकडे हात पसरत नाहीत, असे सूचक विधान केले होते. त्यानंतर अनिल देशमुखांनी Anil Deshmukh जे आमच्यातून गेले आहेत, त्यांना पुन्हा माघारी पक्षात घ्यायचं नाही हे आमचे ठरले आहे, असे स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अनिल देशमुखांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्यांना परतीचे दरवाजे बंद केल्याचा इशारा दिला आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटात गेलेले बजरंग सोनवणे आणि निलेश लंके Nilesh Lanke यांनी पुन्हा शरद पवार गटात परतले आहेत. सोनवणे यांना बीडमधून तर लंके यांना दक्षिण नगरमधून लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्या मतदारसंघात शरद पवारांचा झंजावातही राज्याने पाहिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar, Ajit Pawar
Mahadev Betting App Case : महादेव बेटिंग ॲप प्रकरण : मुख्य आरोपींच्या मध्य प्रदेशमध्ये मुसक्या आवळल्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com