Navi Mumbai Politics : महायुती सत्तेत आल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये वाद असल्याचे समोर येत आहेत. आता या वादाचा पुढचा अंक नवी मुंबईच्या प्रभाग रचनेमुळे समोर आला आहे. शुक्रवारी नवी मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. या प्रभाग रचेवर ठाण्याचा प्रभाव असल्याचा आरोप गणेश नाईक समर्थकांनी केला.
प्रभाग रचना नियमाला धरून नसल्याचा गणेश नाईक समर्थकांचे म्हणणे आहे. त्यावर एका बैठकीत हा डाव आपल्याला माहिती आहे तो मी उधळून लावेल, असे थेट आव्हान गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना दिलं. त्यामुळे प्रभाग रचनेवरून नाईक-शिंदे हे आमने सामने येणार आहेत.
प्रभाग रचनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील आक्षेप घेण्यात आला आहे. एकसंध रहिवाशी असलेले भाग तोडून चुकीच्या पध्दतीने वार्ड रचना करण्यात आली आहे. सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांना कसा फायदा होईल, हे या वाॅर्ड रचनेतून पाहिले गेले आहे. जर यात सुधारणा केली नाही तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देण्यात आला आहे.
नवी मुंबई महापालिकेत 2015 ची निवडणूक ही एक प्रभाग एक नगरसेवक या प्रमाणे झाली होती. मात्र, नव्या प्रभाग रचनेत चार सदस्यांचा एक प्रभाग करण्यात आला आहे. नव्या प्रभाग रचनेनुसार 28 प्रभागात 111 नगरसेवक असणार आहेत. विशेष म्हणजे कल्याण ग्रामीणमधील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश झाला आहे त्यामुळे नगरसेवक संख्या वाढेल असा अंदाज होत मात्र तो फेल ठरला. 2015 ला 111 नगरसेवक होते त्या प्रमाणे यंदा देखील 111 नगरसेवकच असणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.