Ganpat Gaikwad, Mahesh Gaikwad Sarkarnama
मुंबई

Ganpat Gaikwad Firing : आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणी वाढल्या; अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा...

Atrocity case : जमीन मालकांनी ही जमीन आमची आहे. तुम्ही ती हडप केली आहे. आता कंपाउंड घालू देणार नाही, असे म्हणत आमदार गायकवाड यांच्याशी हुज्जत घातली होती.

Bhagyashree Pradhan

Dombivli: पोलिस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. तब्बल सहा गोळ्या महेश यांना लागल्या आहेत. या प्रकरणी गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने कोठडी देखील सुनावली आहे. मात्र, हा गोळीबार ज्या जमीन प्रकरणावरून झाला त्या जमीनीचे मालक पुढे आले आहेत. त्यांनी गणपत गायकवाड यांच्या विरोधात शनिवारी (ता.3)रात्री ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे गायकवाड यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. (Ganpat Gaikwad Firing)

गोळीबार प्रकरणानंतर द्वारली गावातील जमीन मालकांनी आम्हाला देखील पोलिस सुरक्षा हवी असल्याची मागणी केली. हिललाईन पोलिस ठाण्यात येऊन आमदार गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार जमीन मालकांनी हिललाईन पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री दिली. त्यानुसार गणपत गायकवाड यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी (Atrocity)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बुधवारी (ता.31) सकाळी आमदार गणपत गायकवाड हे द्वारली येथील जमिनीवर कंपाउंड घालण्यासाठी गेले होते. तेथील जमीन मालकांनी ही जमीन आमची आहे. तुम्ही ती हडप केली आहे. आता कंपाउंड घालू देणार नाही, असे म्हणत आमदार गायकवाड यांच्याशी हुज्जत घातली होती. तुम्ही पैसे दिले नाहीत, असा आरोप जमीन मालकाने केले होता. मात्र, आमदार गायकवाड यांनी आरोपाचे खंडन करत आम्ही त्यांना पैसे दिले आहेत. शिवाय कोर्टात केस देखील जिंकली आहे. ती जमीन आमचीच आहे, असे ठासून सांगितले होते.

त्यानंतर द्वारली गावातील जमीन मालक शिवसेना (शिंदे गट) नेते महेश गायकवाड यांच्या भेटीस गेले. महेश गायकवाड यांनी मी तुमचा प्रश्न सोडवतो असे सांगितले होते. महेश गायकवाड जमीन मालकांना घेऊन हिललाईन पोलिस ठाण्यात पोहोचले होते. पण यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT