Thane Political News : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळ्या झाडल्या. आमदार गायकवाडांनी केलेल्या गोळीबारात सहा गोळ्या महेश गायकवाड यांना तर दोन गोळ्या राहुल पाटलांना लागल्या आहेत. दोघांची शस्त्रक्रिया झालेली असून त्यांच्या शरीरातून गोळ्या काढण्यात आल्या आहेत. त्यांना कुठे-कुठे गोळ्या लागल्या होत्या याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली.
गोळीबारात जखमी झालेल्या महेश गायकवाडांना (Mahesh Gaikwad) सहा गोळ्या लागल्या आहेत. त्यातील तीन गोळ्या पाठीमागील बाजूला लागल्या आहे. यातील एक गोळी छातीत, एक पोटात, एक जांघेत आणि एक स्पाईनमध्ये तसेच दोन गोळ्या उजव्या शोल्डरला लागल्या आहेत. तर राहुल पाटील यांना एक काखेत आणि एक हाताला गोळी लागली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असून पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
गायकवाड आणि पाटील या दोघांना कल्याण येथून रात्री ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. गायकवाड यांच्यावर सुमारे सहा तास शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी सहा गोळ्या बाहेर काढल्या. तर पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया करून दोन गोळ्या बाहेर काढल्या. आता दोघांनाही अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. राहुल पाटील यांना दोन दिवस आयसीयुमध्ये ठेवले जाणार असल्याचेही रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान,हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचा निर्णय गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) घेतला. या गोळीबाराच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड आणि राहुल पाटलांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. तर आमदार गायकावाड यांना पोलिसांनी उल्हासनगर कोर्टात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आमदाराने पोलिस ठाण्यातच केलेल्या आठ राऊड फायरिंगमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.