Ganpat Gaikawad Sarkarnama
मुंबई

Ganpat Gaikwad Case : अखेर आमदारामधील बाप हतबल झाला; मुलाच्या बचावासाठी गोळीबार केला, शेवटी नको तेच घडलं

Bjp Mla Ganpat Gaikwad Firing Case : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार का केला? मोठी माहिती समोर...

Bhagyashree Pradhan

BJP MLA Ganpat Gaikwad Booked :

उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आणि राज्यात एकच खळबळ उडाली. आमदार गायकवाड यांना बारा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र या सगळ्यामध्ये आपल्या मुलाला गोवले गेले आहे, असा आरोप आमदारांनी उल्हासनगर कोर्टात न्यायाधीशां समोरही केला होता.

ज्या मुलाच्या राजकीय संरक्षणासाठी हा प्रकार घडला. त्यात आमदारांचा मुलगाही या गोळीबार प्रकरणात अडकला असल्याने आमदारात दडलेला हतबल बाप ( Ganpat Gaikwad ) काल उल्हासनगर कोर्टाच्या बाहेर पाहिला मिळाला.

आमदार गायकवाड यांचा मुलगाही अडकला

आमदार गणपत गायकवाड हे गेली पंधरा वर्षे कल्याण पूर्वचे आमदार आहेत. त्यांची पुढील कारकीर्द त्यांचा मुलगा वैभव गायकवाड चालवणार असे चित्र होते. कोणताही बाप ज्याप्रमाणे मुलासाठी हतबल असतो त्याप्रमाणे गणपत गायकवाडही मुलासाठी हतबल झाले होते. गोळीबार करतानाही मुलगा जेव्हा केबिनच्या बाहेर गेला त्यानंतरच त्यांनी पिस्तुल काढून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होता.

आपल्या मुलावर कुठेही गुन्हा नोंद होऊ नये यासाठी आमदार झटत होते. मात्र अखेर वैभव गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालाच. एका वृत्तवाहिनी दिलेल्या मुलाखतीतही माझ्यातला बाप जागा झाला आणि म्हणून मी गोळीबार केला, असे वक्तव्य त्यांनी केले होते. मुलगा वैभवला त्यांनी धक्काबुक्की केल्याने आपण संतप्त झालो आणि हे कृत्य केले, असेही सांगितले होते. मात्र अशी कोणतीही धक्काबुक्की वैभव यांच्यावर झाली नाही, अशी माहिती पोलिस देत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वैभव गायकवाड पेशाने पायलट

वैभव गायकवाड हा आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा आहे. वैभव हा पेशाने पायलट असून त्याच्याकडे कमर्शियल पायलटचे लायसन्सही आहे. खरंतर वैभवला राजकारणात अजिबात रस नव्हता. मात्र आपल्या वडिलांच्या आग्रहास्तव आणि त्यांचा मान राखण्यासाठी तो राजकारणात नुकताच हळूहळू पुढे येत होता. एकंदरीतच गणपत गायकवाड यांच्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द वैभव चालवणार असल्याचे दिसत होते. सध्या वैभव भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे.

पोलिस सूत्रांची माहिती

सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिले तर सुरुवातीला वैभव वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये येऊन बसला. त्यानंतर पुन्हा बाहेर गेला. त्यानंतर तो पुन्हा आत आला. यावेळी त्यांनी हातवारे केल्याचे दिसून येत आहेत. मात्र ज्यावेळी गोळीबार झाला त्याच्या आधी वैभव आणि त्याचा एक साथीदार विकी गणात्रा हे केबिनच्या बाहेर निघून गेले होते.

त्यानंतर दोन मिनिटांनी आमदार गायकवाड यांनी आपल्या खिशातील पिस्तुल काढली आणि थेट महेश गायकवाड यांच्या अंगावर रोखून फायरिंग सुरू केली. या प्रकरणात वैभव हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिल्याप्रमाणे हातवारे करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याच्यावर हा गुन्हा दाखल केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. आता गुन्हा दाखल झाल्याने त्याचे कमर्शिअल पायलटचे लायसन्स रद्द होणार का? अशी चर्चा आहे.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT