BJP MLA Ganpat Gaikwad
BJP MLA Ganpat GaikwadSarkarnama

Ganpat Gaikwad Firing Case : आमदार गणपत गायकवाडांनंतर आता कार्यकर्तेही अडचणीत; गुन्हा दाखल

BJP MLA Ganpat Gaikwad Firing: गणपत गायकवाड यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यांच्यासह सात जणांविरोधात हिललाईन पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला.
Published on

Dombivli News: कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री शिवसेनेचे (शिंदे गट) शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस स्थानकात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबार केला. त्यामुळे राज्यभर मोठी खळबळ उडाली. या गोळीबार प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर पोलिसांनी गणपत गायकवाडांना अटक केली. (BJP MLA Ganpat Gaikwad Firing Case)

यानंतर आमदार गायकवाड यांना शनिवारी उल्हासनगर येथील चोपडा कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी आमदार गायकवाड यांच्या समर्थकांनी कोर्टाच्या बाहेर मोठी गर्दी करत आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली होती. मात्र, हीच घोषणाबाजी आमदार गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांच्या अंगलट आली आहे. घोषणाबाजी करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांवर कलम 144 च्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP MLA Ganpat Gaikwad
Ganpat Gaikawad Firing Case : गणपत गायकवाडांची आमदारकी जाणार की राहणार ? काय होऊ शकते कारवाई

कार्यकर्त्यांनी काय घोषणा दिल्या होत्या ?

"कोण आला रे कोण आला... कल्याणचा वाघ आला, भारतीय जनता पार्टीचा विजय असो.., गणपत गायकवाड आगे बढो हम तुम्हारे साथ है, गरीब का नेता कैसा हो... गणपत गायकवाड शेठ जैसा हो", अशा घोषणा कोर्टाच्या बाहेर गणपत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या.

कोणावर गुन्हे दाखल झाले ?

गुड्डू खांन, मोना शेठ, निलेश बोबडे , शीला राज, सुरज खान, अंजली खामकर, विद्या त्रिंबके, भावेश टोळ, सरिता जाधव, लावण्या दळवी, यशोदा माळी आणि इतर 25 ते 30 अनोळखी महिला-पुरुष यांच्यावर जमावबंदीचा म्हणजेच अधिनियम 37(3), 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गायकवाडांच्या अडचणीत आणखी वाढ

हिललाईन पोलिस ठाण्यातील गोळीबार प्रकरणातील आरोपी आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गणपत गायकवाड यांच्यासह सात जणांच्याविरोधात हिललाईन पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा करण्यात आला आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

BJP MLA Ganpat Gaikwad
Thackeray Vs Shinde : "भाजप आमदार मुख्यमंत्र्यांना गद्दार म्हणतो, मग...", ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com