Ravindra Chavan Sarkarnama
मुंबई

Ravindra Chavan On Ganpat Gaikawad : कल्याण पूर्वमध्ये भाजपचा दावा कायम; गणपत गायकवाडांबाबत रवींद्र चव्हाण म्हणाले...

Sunil Balasaheb Dhumal

Kalyan Political News : कल्याणच्या पूर्व भागात महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये मोठी टशन सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत येथील वातावरण काहीसे निवळले असले तरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभय पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.

भाजपच्या कल्याण जिल्हा कार्यकारणीच्या अधिवेशनात आमदार गणपत गायकवाड समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर रवींद्र चव्हाण यांनी कल्याण पूर्व मतदारसंघात भाजप आमदार गणपत गायकवाड असल्याने ही जागा भाजपच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गणपत गायकवाड विधानपरिषदेत मतदानासाठी आले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून तयारी सुरू केली आहे. कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, अबरनाथ, कल्याण ग्रामीण, डोंबिवली विधानसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला होता. भाजप कल्याण जिल्हा कार्यकरणीची रविवारी कल्याणमध्ये अधिवेशन पार पडले.

या आधी कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड Ganpat Gaikwad यांच्या संपर्क कार्यालयात भाजपच्या कल्याण जिल्हा कोरकमिटीची बैठक झाली. या बैठकीत कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड आणि इतर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

या पार्श्वभूमीवर 'कल्याण पूर्वेत व्हा तयार, करू पुन्हा एकदा विजयाचा एल्गार' या आशयाचे बॅनर झळकले होते. हे बॅनर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या वतीने लावण्यात आलेले आहेत.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख विशाल पावशे यांचे बॅनर लागले होते. त्या पाठोपाठ आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांचे बॅनर लागल्याने एकच चर्चा रंगली होती. कल्याण पूर्व विधानसभेसाठी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या नावाची चर्चा रंगली होती.

या अधिवेशनात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांची घोषणाबाजी केली. भाजप आमदार गणपत गायकवाड, सुलभा गायकवाड आगे बढो अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावर रवींद्र चव्हण Ravindra Chavan म्हणाले, कल्याण पूर्व मतदारसंघात भाजप आमदार गणपत गायकवाड असल्याने ही जागा भाजपच लढणार आहे. डोंबिवलीत मी आमदार आहे, मात्र त्या ठिकाणीही अनेक लोक इच्छुक आहेत.

इच्छुक असणे हे चूक नाही, तसेच त्या-त्या पक्षाने दावा करणे हेही योग्यच आहे. कार्यकर्त्यांनी तसे राहिले तर स्पोर्टमन स्पिरीट राहते, असे मतही चव्हाण यांनी व्यक्त केले.

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने देखील दावा केला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपच लढणार असल्याचे स्पष्ट केल्याने आता शिवसेना शिंदे गट काय भूमिका घेते याकडे लक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT