Vijaykumar Gavit : लेकीविरोधात जिल्हा परिषदेत अविश्वास ठराव, मंत्री गावितांनी केला मोठा दावा, म्हणाले...

Dr. Supriya Gavit, Vijaykumar Gavit News : राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ. सुप्रिया गावित या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असून त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आलेला आहे.
Dr. Supriya Gavit, Vijaykumar Gavit
Dr. Supriya Gavit, Vijaykumar GavitSarkarnama
Published on
Updated on

सागर निकवाडे

Nandurbar News, 28 July : राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ. सुप्रिया गावित (Supriya Gavit) या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असून त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आलेला आहे.

मात्र, हा अविश्वास ठराव पास होणार नसल्याचा विश्वास मंत्री गावित यांनी व्यक्त केला आहे. शिवाय विरोधकांचं स्वप्न उध्वस्त होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. नंदुरबार जिल्ह्यावर मागील अनेक वर्षांपासून वर्चस्व असणाऱ्या गावित कुटुंबीयांच्या वर्चस्वाला लोकसभा निवडणुकीपासून हादरे बसायला सुरुवात झाली आहे.

डॉ. हिना गावित (Heena Gavit) लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत पराभूत झाल्या तर आता विजयकुमार गावित यांची दुसरी कन्या डॉ. सुप्रिया गावित यांचे जिल्हा परिषद अध्यक्षपद धोक्यात आले आहे. सुप्रिया गावित यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेस आणि सत्तेत असलेले शिंदे गट हे भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत.

Dr. Supriya Gavit, Vijaykumar Gavit
Bacchu Kadu : बच्चूभाऊंनी वाढवलं महायुतीचं टेन्शन, नव्या राजकीय समीकरणासाठी मनोज जरांगेंना आमंत्रण

यातच काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. यावर स्पष्टीकरण देताना मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी हा अविश्वास ठराव हा पास होणार नसून आमच्याकडे पुरेसं संख्या बळ असल्याचा दावा केला आहे.

Dr. Supriya Gavit, Vijaykumar Gavit
Manoj Jarange Patil : आंबेडकरांचा 'तो' दावा जरांगे-पाटलांनी खोडला; म्हणाले, भल्या-भल्यांना...

शिवाय विरोधकांचे स्वप्न उध्वस्त होणार असल्याची टीका देखील विजयकुमार गावित यांनी केली आहे. त्यामुळे आता हा ठराव पास होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवाय अविश्वास प्रस्ताव पास झाल्यास मंत्री गावित यांच्यासाठी हा मोठा धक्का असू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com