Eknath Shinde On Narendra Modi Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde On Narendra Modi : 'गरिबी हटाव' घोषणा झाल्या, पण मोदींनींच गरिबी हटवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा

Chetan Zadpe

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्रातील जनेतला संबोधित केले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) सर्वांना शुभेच्छा दिल्या. भाषणामध्ये त्यांनी वर्षभरात राज्य सरकारच्या वतीने केलेल्या कामांचा पाढाच वाचून दाखवला. पूर्वीच्या सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका करत त्यांनी सरकारच्या कामांची यादी वाचून दाखवली. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "यापूर्वीही काही लोकांनी देशातली गरिबी हटावचा नारा दिला. मात्र ही घोषणा राहिली. पण गेल्या पाच वर्षात खऱ्या अर्थाने पंतप्रधानांनी गरिबी हटवण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षभरात सरकारने अनेक निर्णय घेतलेले आहेत. मी सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या हित लक्षात घेतलेले आहेत, शासन आपल्या दारी महत्त्वाचा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न थेट सोडवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत"

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "शेतकऱ्यांसाठी आपण पिक विमा सुरू केली. राज्यात अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.रखडलेल्या जलसंपदा योजनांना आपण चालना दिली आहे. त्यामुळे जवळपास आठ लाख क्षेत्रफळाचे जमीन पाण्याखाली येणार आहे. आपण आपल्या सरकारने ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत केलेला आहे, त्याचबरोबर महिलांना देखील केलेला आहे."

"दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची सरकारने पहिल्यांदाच स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्री सहायता निधीतून बारा हजार हून अधिक नागरिकांना मदत करत, यातून शंभर कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च केले," असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT