Nawab Mailk, Sharad Pawar, Ajit Pawar
Nawab Mailk, Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama

Nawab Malik And NCP Crisis : नवाब मलिकांसाठी शरद पवार-अजितदादा गटांकडून 'फिल्डिंग'; नेमकं काय झालं ?

Sharad Pawar Vs Ajit Pawar : नवाब मलिकांच्या राजकीय भूमिकेकडे राज्याचे लक्ष

Mumbai News : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाने प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, सोमवारी जामीनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते तुरुंगाबाहेर आले आहेत. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गटाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यामुळे दोन्ही गटांकडून मलिकांसाठी 'फिल्डिंग' लावली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता मलिक काय राजकीय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (Latest Political News)

Nawab Mailk, Sharad Pawar, Ajit Pawar
Nawab Malik Breaking News : तुरूंगातून पाय निघताच मलिकांच्या चेहऱ्यावर झळकला पुन्हा 'तो'च कॉन्फिडन्स !

गोवावाला कंपाऊंडमधील 'मनी लाँडरिंग'प्रकरणी मलिकांना 'ईडी'ने फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक केली होती. दरम्यान, जामीनासाठी केलेले अर्ज फेटाळण्यात आल्याने मलिकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा देत तब्बल दीड वर्षानंतर ११ ऑगस्टला आजारपणाच्या कारणास्तव जामीन मंजूर केला.

नवाब मलिकांना जामीन मिळताच राजकीय वर्तुळातून उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजपच्या 'हिटलिस्ट'वर असलेल्या मलिकांना राष्ट्रवादी फुटील्यानंतरच जामिनावर कसे सुटले, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. यातच दोन्ही गटाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मलिकांसाठी क्रिटीकेअर रुग्णालयात गर्दी केली होती. ही गर्दी कशासाठी, यावरही आता चर्चा झडू लागली आहे.

Nawab Mailk, Sharad Pawar, Ajit Pawar
Nawab Malik Bail: फडणवीसांसोबत पंगा घेतलेल्या 'वजनदार' मलिकांचं २२ किलोनं घटलं वजन !

क्रिटीकेअर रुग्णालयात मलिकांना भेटण्यासाठी अजित पवार गटाचे मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे पोहोचले त्यावेळी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेही तेथेच होत्या. यावेळी मात्र राणेंकडे दुर्लक्ष करत त्या आपल्या कामात व्यस्त राहिल्याचे दिसून आले. राणेंची सुळेंनी दखल घेतली नसल्याने दोन्ही गटाकडून मलिकांसाठी पायघड्या घालण्याचे काम सुरू असल्याची बोलले जात आहे. दरम्यान, शरद पवारांचे समर्थ असलेले मलिक बदलेल्या राजकीय स्थितीनंतर कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Nawab Mailk, Sharad Pawar, Ajit Pawar
Congress Vs BJP : भाजपला मत देणारे 'राक्षस'; काँग्रेस नेत्याच्या विधानाने वादाची ठिणगी

दरम्यान, जामीन देताना कोर्टाने मलिकांना अनेक अटी घातल्या आहेत. या अटींचे पालन करून मलिकांना सावधपणे राजकीय भूमिका घ्यावी लागणार आहे. मालिकांना ५० हजारांच्या वैयक्तिक बॅान्डवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणातील साक्षीदार व अधिकारी यांच्याशी मलिकांनी संपर्क ठेवायचा नाही. मलिकांशी संपर्क होईल, तो नंबर 'ईडी'च्या अधिकाऱ्यांना देण्यात यावा. मलिकांचा पासपोर्ट 'ईडी'कडे जमा करण्यास सांगण्यात आले आहे. याबरोबरच कुठल्याही माध्यमाशी संवाद साधायचा नाही, अशी अटी जामीन मंजूर करताना कोर्टाने घातल्या आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com