Shrikant Shinde on Gen Z News : देशभरात सध्या जनरेशन झेड अर्थात जेनझींचीच चर्चा सुरु आहे. कुठल्याही सार्वजनिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतीक कार्यक्रम असू देत जेनझींची सध्या चलती आहे. राजकारण्यांनी कायमच प्रत्येक पिढीतल्या तरुणांना भडकावून आपल्या राजकारणासाठी त्यांचा वापर केल्याची उदाहरण सांगता येतील.
पण आत्ताची तरुण पिढी अर्थात जेनझींना अशा प्रकारे भडकावून त्यांना भरकटवता येईल का? तर नाही, असं उत्तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलं आहे. मीडियाशी प्रश्नोत्तरादरम्यान त्यांना विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाची सध्या चर्चा सुरु आहे.
मुंबईत तरुणांसाठी आयोजित एका कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांनी जेनझी तरुणांशी संवाद साधला. कार्यक्रम संपल्यानंतर मीडियाच्या प्रश्नोत्तरामध्ये त्यांना या कार्यक्रमाबद्दल विचारलं असता श्रीकांत शिंदे म्हणाले, "आज इथं एक चांगला कार्यक्रम पार पडला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण मंडळी सामील झाली होती, मला वाटतं जेनझींना एक टार्गेट ऑडियन्स न माणता या तरुणांचं काय म्हणणं आहे.
त्यांच्या काय समस्या आहेत आणि त्यांच्या सूचना काय आहेत? सरकारकडून त्यांना काय हवं आहे? हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं मला इकडं भाषण करायला बोलावलं गेलं होतं. इथं तरुण मंडळी मोठ्या प्रमाणावर होती, त्यामुळं मला वाटलं की त्यांच्याशी आपण संवाद साधावा. त्यांच्याकडून जाणून घ्यावं की, ते काय विचार करतात.
मला वाटतं जेनझीा जे आहेत त्यांना लोक जास्त गांभीर्यानं घेत आहेत. देशाची एक तृतीयांश लोकसंख्या तरुणांची आहे. त्यामुळं त्यांच्याशी चर्चा केली यामुळं त्यांनाही वाटायला पाहिजे की सरकारच्या माध्यमातून बातचीत होत आहे, सर्वांना ऐकलं जात आहे.
दरम्यान, जेनझींना भडकावलं जात असल्याचा मुद्दा एका पत्रकारानं काढला त्यावर श्रीकांत शिंदे म्हणाले, "जेनझी खूपच हुशार आहेत कोणीही काहीही बोललं तर ते असेच भडकण्यातले नाहीत. त्यामुळं त्यांना माहितीए आपल्याला काय करायचं, अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
एकूनच राजकीय लोकांकडून धार्मिक मुद्द्यांवरुन समाजात फूट पाडून त्यांना एकमेकांविरोधात उभं केलं जात आहे. यातून राजकीय पोळ्या भाजल्या जात आहेत. यामध्ये सर्वात सॉफ्ट टार्गेट असतात ते म्हणजे तत्कालीन तरुण वर्ग.
पण सध्याचा तरुण वर्ग अर्थात जेनझी हे कोणाचंही ऐकत नाहीत उलट आपल्याला जे पटेल तेच करतात, असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळं त्यांच्यापुढे तुम्ही कितीही राजकीय अजेंडे मांडले तरी त्यांना ते प्रतिसाद देतीलच याची गॅरँटी नाही. त्यामुळं सध्या जेनझी तरुणांना जसं वाटतं त्याप्रमाणे राजकीय कार्यक्रम आखले जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.