RSS Chief Mohan Bhagwat talk with GenZ youth at Mumbai 
मुंबई

Mohan Bhagwat: जेनझी तरुणाचा सरसंघचालकांना थेट सवाल! "आम्ही आंदोलन करतो तेव्हा देशद्रोही ठरवलं जातं"; मोहन भागवतांनी काय दिलं उत्तर?

Mohan Bhagwat: देशभरातून जेनझी तरुण आपल्या अधिकारांसाठी आक्रमक होत असताना भाजप सरकारवर विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. यापार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी स्वतःच मुंबईत या तरुणांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

Amit Ujagare

Mohan Bhagwat: देशभरातून जेनझी तरुण आपल्या अधिकारांसाठी आक्रमक होत असताना भाजप सरकारवर विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. यापार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी स्वतःच मुंबईत या तरुणांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी या तरुणानं भागवतांना थेट सवाल केला की, जेव्हा आम्ही आमच्या अधिकारांसाठी आंदोलन करतो तेव्हा आम्हाला देशद्रोही ठरवलं जातं. यावर भागवतांनी या तरुणांच्या प्रामाणिकपणावर मोठं भाष्य केलं.

मुंबईत सुरु असलेल्या या संवादादरम्यान एका जेनझी तरुणासोबत मोहन भागवत यांनी समोरासमोर बसून संवाद साधला. यावेळी भागवतांनी मुंबईसह दिल्ली आणि देशभरात जेनझी तरुणांनी केलेल्या आंदोलनावर चर्चा सुरु केली. त्यानंतर या तरुणानं भागवतांना थेट प्रश्न केला की, तुम्ही म्हणालात निषेध आंदोलन हे विशिष्ट दिशेनं आणि पद्धतीनं करायला हवं. पण असंही आता दिसून आलं आहे की आम्ही जेव्हा आंदोलन करायला निघालो तर लोक आम्हाला देशद्रोही म्हणतात तसंच हे लोक एखाद्या देशाचे एजंट आहेत, असे आरोपही आमच्यावर करतात.

यावर प्रश्न मध्येच तोडत त्यावर उत्तर देताना भागवत म्हणाले, "मी तुम्हाला सांगू इच्छितो की, जर जेनझी आंदोलन करत असतील तर ते देशद्रोही नाहीत. आपलेच लोक आहेत. आपलीच पुढची पिढी आहे. दोन्ही पिढ्यांमध्ये संवाद आणि संबंध असला पाहिजे. हा संबंध आमचा आहे. तो दिसून आला पाहिजे. तेव्हाच ही चर्चा होऊ शकते, समोरच्याची बाजू आम्हाला कळू शकते आमची बाजू त्यांना कळू शकते. त्यामुळं हे अशा प्रकारे व्हायला पाहिजे. तसंच जेनझींबद्दल जे काही बोललं जातं मी तसं मानत नाही. आजही मी तुमच्यासमोर बोललो आहे की, मला वाटतं की ही जी नवी पिढी आहे जेनझी, जेन अल्फा ती आजच्या आमच्या पिढीपेक्षा जास्त प्रामाणिक आहे. तसंच देशभक्ती आणि सेवेचा आदर्श या पिढीमध्ये दिसून येतो"

मोदींना रील करणं भाग पडलं

दरम्यान, दिल्लीच्या जंतर-मंतरवर ज्या पद्धतीनं जेनझीनं मोठ्या उत्साहात आंदोलन आणि मोर्चा काढला त्यासाठी देशभरातून लाखो तरुण रस्त्यावर उतरले. त्यामुळं मोदी सरकारलाही त्यांच्यासमोर झुकावं लागलं आणि आपल्या शिक्षण मंत्र्यांच्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. पण जेनझींमधील सरकारविरोधातील राग पाहता सरकारमध्येही यावरुन मंथन सुरु झालं आहे. त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वेळेला या तरुणांच्या भाषेत म्हणजेच सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तो ही मध्यरात्री साडे अकरा बारा वाजण्याच्या सुमारास कारण याच वेळेत ही तरुण पिढी सर्वाधिक काळ मोबाईलवर सर्फिंग करत असते.

...म्हणून भागवतांना चर्चा करावीशी वाटली

पण आता त्यांचेही प्रयत्न तोकडे पडलेत की काय म्हणून थेट भाजपची मातृसंस्था असलेल्या आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनीही जेनझी तरुणांसोबत चर्चा करणं गरजेचं असल्याचं मान्य केलं आणि त्यांच्याशी संवादही साधला. त्यांची एकूणच सरकार, समाजाबदद्लची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT