CJP Big Announcement : कॉक्रोच जनता पार्टीचं संघटनात्मक काम सुरु! पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; कोणाला कुठलं पद मिळालं?

CJP National Committee: बघता बघता कॉक्रोच जनता पार्टी आता एक एक पाऊल पुढे टाकच असल्याचं चित्र आहे. दिल्लीत यशस्वी आंदोलन केल्यानंतर आता पक्षानं दबाव गट म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला.
CJP National Committee
CJP National Committee
Published on
Updated on

CJP National Committee: बघता बघता कॉक्रोच जनता पार्टी आता एक एक पाऊल पुढे टाकच असल्याचं चित्र आहे. दिल्लीत यशस्वी आंदोलन केल्यानंतर आता पक्षानं दबाव गट म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला असून या संघटनेला मूर्त स्वरुप देण्यासाठी पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, देशभरात आता कॉक्रोच जनता पार्टीचे तरुण रचनात्मक काम करताना दिसतील. पण या कार्यकारिणीत कोणाला कुठलं पद देण्यात आलं आहे? जाणून घ्या.

CJP National Committee
Shivsena: ठाकरेंच्या वकिलांना फुल्ल कॉन्फिडन्स! सांगितलं शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' पक्षचिन्हाच्या वादाचा निकाल कधी लागणार...

कॉक्रोच जनता पार्टीचं छत्रपती संभाजी नगरमध्ये पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी दोन दिवसीय कॉक्रोच कॉन्क्लेव्ह पार पडली. या बैठकीत देशातील तरुणांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर यापुढची संघटनेची वाटचाल कशी असेल याबाबत काही निर्णय घेण्यात आले. त्यानुसार, आता या संघटनेकडून जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा लक्षात घेता रितसर देशभरात कामाचं वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याअनुषंगानं पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

६ ऑगस्ट २०२६ या तारखेनं काढलेल्या या अधिकृत पत्रकानुसार,

  1. संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक - अभिजीत दिपके (वय ३०)

  2. उपसमन्वयक - आशुतोष रांका (३०), सौरव दास (२७)

  3. नॅशनल ऑर्गनायझेशन इनचार्ज - अजिंक्य शिंदे (३५)

  4. ऑर्गनायझेशन को-इनचार्ज - दीपक बलिया (२६)

  5. राष्ट्रीय सचिव - आफरिन नवाज (३४)

  6. मीडिया लीड - विजय रेड्डी मल्लांगी (३०)

  7. लिगल अफेअर्स लीड - रत्ना सिंह (३१)

  8. रिसर्च अँड पॉलिसी लीड - वैष्णवी गौर (२९)

  9. तंत्रज्ञान प्रमुख - रोहन देशपांडे (३१)

  10. फायनान्स प्रमुख - योगेश इंगळे (३३)

    झोनल नेतृत्व

  11. नॉर्थ झोन - दीपक बलिया (२६)

  12. साऊथ झोन - विजय रेड्डी मल्लांगी (३०)

  13. ईस्ट-नॉर्थ ईस्ट - अंकित भारद्वाज (३५)

  14. वेस्ट झोन - योगेश इंगळे (३३)

CJP National Committee
Walmik Karad: तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडच्या 'व्हीआयपी ट्रिटमेंट'वर बीड कारागृहाचा खुलासा! शहा, फडणवीसांकडे तक्रार झाल्यानंतर आली जाग

दरम्यान, येत्या सहा महिन्यांत सीजेपीकडून राज्यपातळीवरील समन्वय समित्यांची देखील घोषणा करण्यात येणार आहे. यामध्ये देशभरातील लोकसभा मतदारसंघ आणि शहर पातळीवरील समन्वय युनिट्सचा समावेश असेल, असंही कॉक्रोच जनता पार्टीकडून जाहीर करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com