Mumbai News, 28 Dec : मुंबईतील (Mumbai) कुर्ला येथील बेस्ट बस अपघाताची घटना ताजी असतानाच घाटकोपरमध्ये एका टेम्पो चालकाने भाजी मार्केटमध्ये गाडी घुसवून पाच ते सहा जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
घाटकोपर (Ghatkopar) येथील चिराग नगर मार्केटमध्ये ही घटना घडली आहे. तर या घटनेत प्रीती रितेश पटेल या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रेश्मा शेख, मारूफा शेख, तोफा शेख आणि मोहरम अली अब्दुल रहीम शेख हे पादचारी जखमी आहेत. या प्रकरणी चालक उत्तम बबन खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
चिराग नगर मार्केट येथे टेम्पो चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्यामुळे बाजारातील पाच ते सहा जणांना टेम्पोने चिरडलं. स्थानिकांनी जखमींना राजवाडी रुग्णालयात उपचारासाठी नेलं आहे. घटनेनंतर घाटकोपर पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं. रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिसांचा तपास सुरू होता.
मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या अपघातानंतर मुंबईत (Mumbai) भीतीचं वातावरण पसरलं असून आता मार्केटमध्ये आणि रस्त्यावर देखील मुंबईकर सुरक्षित नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
घाटकोपरमधील अपघातामुळे (Accident) नुकतंच काही दिवसांपूर्वी झालेल्या मुंबईच्या कुर्ला येथील भयानक अपघाताची आठवण अनेकांना झाली आहे. या बेस्ट बस अपघातात दहा हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या प्रकरणातही चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचं सांगितलं गेलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.