Violence In Manipur सरत्या वर्षातही मणिपूर हिंसाचार, द्वेषाच्या आगीत होरपळत राहिला

मैतेई आणि कुकी समाजात पेटलेला हिंसाचाराचा वणवा सरत्या वर्षातही भडकतच राहिला. मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यास कुकी समाजाचा विरोध आहे. त्यातून हा हिंसाचार सुरू झाला. शेकडो लोकांना प्राण गमवावे लागलो, हजारो लोक बेघर झाले, त्यांना स्थलांतरित होऊन शिबिरांमध्ये राहावे लागत आहे.
National Political Scenario
Violence in Manipur in 2024 CM N Biren Singh
Published on
Updated on

ईशान्येकडील मणिपूर या राज्यात गेल्यावर्षी म्हणजे 2023 च्या मे महिन्यात हिंसाचार, जाळपोळ सुरू झाली. त्यानंतर काही महिन्यांनी एका समुदायातील लोकांनी अन्य समुदायाच्या एका महिलेची भरदिवसा नग्नावस्थेच धिंड काढल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आणि हिंसाचाराची दाहकता देशाच्या लक्षात आली.

मैतेई समाजाला आमुसूचित जातीचा दर्जा दिला जाणार, अशा बातम्या आल्या आणि त्यानंतर हिंसाचाराचा हा वणवा पेटला. सरत्या वर्षातही मणिपूरमध्ये हिंसाराचा Manipur Violence हा वणवा धुसमतच राहिला. केंद्र आणि राज्य सरकारला हिंसाचार आटोक्यात आणण्यात सपशेल अपयश आले. National Politics Central Government failed to Control Manipur Violence

हिसांचार सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी त्या संबंधीच्या बातम्या बाहेर याययला लागल्या, त्या अंतर्बाह्य हादरवून टाकणाऱ्या होता. ईशान्येकडील या राज्याची लोकसंख्या 28 लाखांच्या घरात आहे. यात मैतेई समाजाची लोकसंख्या जवळपास 53 टक्के आहेत. या राज्यात भाजपचे BJP सरकार आहे. एन. बिरेन सिंह हे मुख्यमंत्री आहेत. मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यास कुकी समाजाचा विरोध आहे. मैतेई समाज इम्फाळ भागात वसलेला आहे. कुकी समाज हा पर्वतीय भागात वास्तव्य करतो. कुकी जमातीची लोकसंख्या जवळपास 30 टक्के आहे.

मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिला तर सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक सुविधांपासून आपण वंचित राहणार, अशी भावना कुकी समाजात निर्माण झाली. आरक्षणाचा लाभ मैतेई समाजाला मिळेल, आपल्याला काही शिल्लक राहणार नाही, असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे कुकी समाजाने विरोध सुरू केला आणि हिंसाचार पेटला. मणिपूर संस्थान 1949 मध्ये भारतात विलीन झाले. त्यावेळी मैतेईंना अनुसूचित जमातीचा दर्जा होता, विलीनीकरणानंतर काढून घेण्यात आला, असे मैतेई समाजाचे म्हणणे आहे. त्यातूनच त्यांनी अनुसूचित जमातीच्या दर्जा मागणी सुरू केली होती.

हिंसाचार पेटला त्याच्या दहा वर्षे आधीपासून मैतेई समाजाने ही मागणी सुरू केली होती. मात्र सर्वच सरकारांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या समाजाने न्यायालयात धाव घेतली होती. या मागणीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. त्याला ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनने (एटीएसयू) विरोध सुरू केला. त्यासाठी या विद्यार्थी संघटनेने रॅलीही काढली होती. मैतेई समाजाला एससी, ओबीसींसाठीच्या सवलती आधीपासूनच मिळत आहेत. मैतेई हे आदिवासी नसून एससी, ओबीसी आणि ब्राह्मण आहेत, असा या संघटनेचा दावा आहे.

मैतेई समाजाला आधीच इतक्या सवलती मिळत असताना पुन्हा एसटीचा दर्जा देऊ नये, असे या संघटनेचे आणि कुकी समाजाचे म्हणणे होते. मैतेई समाजाचे लोक कुकी समाजाच्या पर्वतीय भागात जाऊन राहू शकत नाहीत, कुकी मात्र इम्फाळमध्ये येऊन राहू शकतात. हे असेच सुरू राहिले तर आम्हाला राहण्यासाठी भविष्यात जागा कमी पडणार. असे मैतेई समाजाच्या लोकांचे म्हणणे होते. यावरून दोन जमातींमध्ये किती टोकाचा मनभेद झाला, हे लक्षात येईल. टोकाचा मनभेद आणि द्वेषामुळे पेटलेले मणिपूर सरत्या वर्षातही धुमसतच राहिले.

हे देखिल वाचा -

National Political Scenario
Maharashtra BJP Politics : मोदी, शाहांच्या धक्कातंत्राला पुरून उरले, देवेंद्र फडणवीस पुन्हा आले !

मणिपूरमध्ये 3 मे 2023 रोजी हिंसाचार सुरू झाला. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 30 मे 2023 रोजी इम्फाळचा दौरा केला. त्यांनी बैठका घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र एकदाही मणिपूरला गेले नाहीत. हिंसाचार आटोक्यात आणण्यात मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना पूर्ण अपयश आले, मात्र त्यांना पदावरून हटवण्यात आले नाही. मैतेई हे प्रामुख्याने हिंदूधर्मीय आहेत. मैतेईंमध्ये मुस्लिमांचाही समावेश आहे. बहुतांश कुकी आणि नागा समाज हा ख्रिश्चन आहे. लोकसंख्या मैतेई समाजाची अधिक आहे. 60 पैकी 40 आमदार मैतेई, 20 आमदार नागा आणि कुकी समाजाचे आहेत, हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे.

गेल्या वर्षभरात जाळपोळ, हाणामाऱ्या, खून, महिलांवर अत्याचाराची मन सुन्न करून टाकणारी अनेक प्रकरणे घडली. परिस्थिती नियंत्रणात आली, असे वाटायला लागले की पुन्हा हिंसाचार सुरू व्हायचा. सरत्या वर्षातही हिंसाचार, जाळपोळीचे प्रकार घडतच राहिले. 3 मे 2024 पर्यंत या हिंसाचारात 221 लोकांचा जीव गेला, तर 1000 लोक जखमी झाले. 60,000 नागरिकांनी स्थलांतर केले आहे. जवळपास 5000 घरे आणि 350 पेक्षा अधिक धार्मिक स्थळांची तोडफोड करण्यात आली आहे. ही सरकारी आकडेवारी आहे. प्रत्यक्षात यापेक्षात जास्त हानी झालेली असणार.

गेल्या दीड वर्षापासून मणिपूर द्वेषाच्या, हिंसाचाराच्या आगीत होरपळून निघत आहे. लष्कराला पाचारण करण्यात आले, दोन्ही जमातींमध्ये समझोत्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. उलट हिंसाचाराचा वणवा जास्तच पेटत राहिला. मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यास विरोध करण्यासाठी 3 मे 2023 रोजी कुकी समाजाने आदिवासी एकता मार्च काढला होता. त्या मार्चदरम्यान कुकी आणि मैतेई समाजात हिंसाचार सुरू झाला. सरत्या वर्षातही ही आग भडकत राहिली. केंद्र, राज्य सरकारच्या सर्व यंत्रणा अपयशी ठरल्या.

हे देखिल वाचा-

National Political Scenario
National Politics in 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्म्याला मर्यादा; विरोधकांना संजीवनी, राहुल गांधींचा उदय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com