Late Gilbert John Mendonca, Mira Bhayandar’s first MLA, who played a key role in local politics for over four decades. Sarkarnama
मुंबई

Gilbert John Mendonca : मिरा-भाईंदरच्या प्रवाशांना लोकल दाखवणारा नेता हरपला; गिल्बर्ट मेंडोसा यांचे निधन

Mira Bhayandar First MLA : मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार गिल्बर्ट जॉन मेंडोसा यांचं निधन झालं आहे. सोमवारी (ता.18) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मेंडोसा यांनी स्थानिक राजकारणात चार दशकांपेक्षा जास्त काळ महत्वाची भूमिका निभावली आहे.

Jagdish Patil

Gilbert John Mendonca Death : मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार गिल्बर्ट जॉन मेंडोसा यांचं निधन झालं. सोमवारी (ता.18) त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मेंडोसा यांनी स्थानिक राजकारणात चार दशकांहून अधिक काळ महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या निधनानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मिरा भाईंदर शहराचे प्रथम आमदार, स्व. गिल्बर्ट मेंडोसा यांचे दुःखद निधन ही अतिशय वेदनादायक घटना आहे. त्यांच्या निधनाने मिरा भाईंदरच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक सशक्त व्यक्तिमत्व हरपले, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पन केली आहे.

गिल्बर्ट जॉन मेंडोसा यांच्या कारकीर्दीची सुरुवात 1978 मध्ये भाईंदरचे सरपंच म्हणून सुरू झाली. स्थानिक लोक त्यांना सेठ नावाने ओळखायचे. सरपंचपदानंतर त्यांनी 1990 मध्ये मिरा-भाईंदर नगरपरिषदेचे अध्यक्षपद भूषवलं आणि 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिरा-भाईंदरचे पहिले आमदार बनले. मात्र, 2014 च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.

2011 मध्ये त्यांनी मीरा भाईंदरपासून लोकलची सुरुवात व्हावी म्हणून आंदोलन देखील केलं होतं. मात्र, त्यांची कारकिर्द अनेक वादग्रस्त घटनांमुळेही गाजली होती. 2016 साली जमीन हडप प्रकरणात त्यांना नऊ महिने तुरुंगात जावं लागलं होतं. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT