Rahul Gandhi : देशाची माफी मागा म्हणणाऱ्या निवडणूक आयोगाला राहुल गांधींचा इशारा, म्हणाले, "तुमचं काम नीट करा, अन्यथा ज्या दिवशी सत्तांतर होईल..."

Rahul Gandhi warns Election Commission : मागील काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगावर केलेल्या व्होट चारीच्या आरोपामुळे देशभरातील राजकारण ढवळून निघालं आहे. तर राहुल गांधींच्या आरोपानंतर आयोगाने देखील पत्रकार परिषद घेत त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले.
Rahul Gandhi warns Election Commission,
Congress leader Rahul Gandhi addressing supporters during his Bihar rally, warning the Election Commission against bias toward BJP in elections.Sarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi On Election Commission : निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे. पण तीनही निवडणूक आयुक्तांनी एक गोष्ट नी समजून घ्यावी. तुम्ही तुमचं काम केलं नाही तर जेव्हा बिहार आणि दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार येईल तेव्हा तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला दिला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगावर केलेल्या व्होट चारीच्या आरोपामुळे देशभरातील राजकारण ढवळून निघालं आहे. तर राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने देखील पत्रकार परिषद घेत त्यांच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देत सर्व आरोप फेटाळून लावले.

शिवाय यावेळी आयोगाने पत्रकार परिषदेतून राहुल गांधींना इशारा दिला होता. मतचोरी सारख्या चुकीच्या शब्दाचा वापर करणं ह भारतीय संविधानाचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधींनी मत चोरीच्या आरोपांबाबत 7 दिवसांत शपथपत्र सादर करावं किंवा देशाची माफी मागावी, असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं होतं.

Rahul Gandhi warns Election Commission,
Trump on EVM: ईव्हीएम अन् पोस्टल मतपत्रिका बंद करणार! ट्रम्प यांची मोठी घोषणा

निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेनंतर आता राहुल गांधींनी थेट निवडणूक आयोगाच्या तीनही आयुक्तांना मोठा इशारा दिला आहे. त्यांनी तीनही आयोगाला आपलं का नीट करण्याचा सल्ला दिला आहे. अन्यथा कडक कारवाई करू असंही म्हटलं आहे.

Rahul Gandhi warns Election Commission,
Shashi Tharoor News : तुम्ही तर साडीतील शशी थरूर..! प्रियांका चतुर्वेदींचा Video व्हायरल होताच थरूर यांचीही खास कमेंट...

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

बिहारमधील मतदार अधिकार यात्रेदरम्यान बोलताना राहुल गांधी म्हणाले, निवडणूक आयुक्तांनी एक गोष्ट नीट लक्षात ठेवावी. जर तुम्ही तुमचं काम केलं नाही तर तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल. आता मोदींचं सरकार आहे ते ठीक आहे. पण कधी ना कधी एक दिवस बिहार आणि दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार येईल. तेव्हा आम्ही तुम्हाला बघून घेऊ, असा इशारा त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com