Girish Mahajan Sarkaranama
मुंबई

Girish Mahajan on Vidhan Parishad Election : मतदानानंतर गिरीश महाजनांचं मोठं विधान, म्हणाले 'काहीही झालं तरी शेवटी...'

Girish Mahajan News : 'मागील तीन-चार निवडणुकी बघितल्या तर शेवटी निकाल..' असंही गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे.

Jagdish Patil

Vidhan Parishad Election 2024 विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज(शुक्रवारी) मतदान पार पडल्यानंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली आहे. 'काहीही झालं तरी शेवटी विजय महायुतीचाच होणार आमच्या नऊच्या नऊ जागा निवडून येतील.' असा दावा महाजन यांनी केला आहे.

निवडणुकीतील मतदानाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता महाजन म्हणाले, "निवडणुकीत 12 उमेदवार आहेत त्यापैकी 11 उमेदवार निवडून येणार आहेत आणि एकाला कोणालातरी पडावच लागणार आहे. काहीही झालं तरी शेवटी आमचाच विजय होतो आम्ही सर्व बाबी तपासून मतदान केलं आहे. मागील तीन-चार निवडणुकी बघितल्या तर शेवटी निकाल आमच्याच बाजूने लागतो," असे ते यावेळी म्हणाले.

तसेच, 'आमचे नऊच्या नऊ उमेदवार निवडून येतील, महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडणार.' असा मोठा दावा देखील गिरीश महाजन(Girish Mahajan) यांनी माध्यमांशी बोलताना केला.

भाजपने पाच उमेदवार विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहेत. त्यापैकी मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिला निकाल हा योगेश टिळेकर यांच्या विजयाचा समोर आला आहे. त्यानंतर पंकजा मुंडे आणि परिणय फुके विजयी झाले आहेत. तर मतमोजणी अद्याप सुरू असून उर्वरीत उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या म्हणून ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास अखेर संपला आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी या हक्काच्या मतदारसंघात चुलत भावाकडून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता.

या पराभवानंतर उद्विग्न झालेल्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी आपल्या पराभवाला भाजपच्या राज्यातील नेत्यांनीच हातभार लावल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT