Maharashtra news : नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपने मंगळवारी (ता.२१) मुंबईत जन आक्रोश महिला पदयात्रा काढली होती. यादरम्यान रस्त्यावर प्रचंड वाहतुक कोंडी झाल्याने एका महिलेने संताप व्यक्त केला होता. मंत्री गिरीश महाजन यांनाही या महिलेच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. या प्रकाराची संपूर्ण देशात चर्चा झाली.
संबंधित महिलेविरोधात आता मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील वकील गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते यांनी ही तक्रार केली आहे. संबंधित महिलेने शासकीय कामात अडथळा आणणे, सार्वजनिक शांतता भंग आणि चेंगराचेंगरीच्या उद्देशाने हिंसक कृत्य केल्या प्रकरणी या महिलेविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार झेन यांनी वरळी पोलिसांकडे केली आहे.
झेन सदावर्ते यांच्या तक्रारीनंतर आता त्याविरोधातही अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियात त्यावरून बरीच चर्चा होत आहे. संबंधित महिले विरोधात FIR दाखल झाल्याची पोस्ट काही जणांनी केली आहे. त्यावर आता मुंबई पोलिसांनी सोशल मीडियातून स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच सोशल मीडियातून खुलासा केला आहे. पोलिसांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, संबंधित महिलेविरोधात एफआयआर नोंदविण्यात आलेला नाही. प्रत्येकाने सोशल मीडियात पोस्ट करण्यासाठी अधिकृत माध्यमातून त्याची खातरजमा करावी आणि चुकीची माहिती पसरविणे टाळावे, असे आवाहनही मुंबई पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, संबंधित महिला नेमकी कोण आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर काही जणांनी एका महिलेचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करत ही महिला तीच असल्याचा दावा केला जात आहे. काही हँडलवरून हा दावा खोडून काढला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.