AAP MLA news : खासदारांपाठोपाठ ‘आप’चे 50 आमदारही फुटणार; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

AAP Punjab split news : राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी भाजपचे देशभरात ऑपरेशन लोटस सुरू असल्याचे विधान सात खासदार फुटल्यानंतर केले आहे.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Sarkarnama
Published on
Updated on

AAP vs BJP political news : राज्यसभेतील सात खासदार फुटून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आता त्यापाठोपाठ आमदारही फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एका बड्या नेत्याने पंजाबमधील ५० खासदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

पंजाबमध्ये २०२२ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ११७ पैकी ९२ जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. आपच्या लाटेत काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांचा सुपडा साफ झाला होता. राज्यात आता २०२७ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याआधीच पक्षाला मोठा झटका बसला आहे.

पंजाबमध्ये आपचे राज्यसभेत सात खासदार असून त्यापैकी सहा खासदार फुटले आहे. हे सर्वजण भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेत्याच्या दाव्याने खळबळ उडाली असून आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. पंजाबमधील आपचे ५० आमदार फुटणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Arvind Kejriwal
Raghav Chadha revolt : ‘आप’मध्ये सर्वात मोठी फूट; अखेर राघव चड्ढा यांचे केजरीवालांना हादरवणारे बंड, सात खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी हा दावा केला आहे. मीडियाशी बोलताना ते म्हणाले, आपचे ५० आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतो, पक्षाने याकडेही लक्ष द्यावे. सध्या केवळ खासदार बाहेर पडले आहेत. आपचे कोणतीही विचारधारा नाही. त्यामुळे खासदार फुटणे नैसर्गिक होते. त्यांचा पंजाबशी काही संबंध नव्हता, असे वारिंग यांनी म्हटले आहे.

दरम्यान, वारिंग यांचा दावा पंजाबमधील आप सरकारसाठी हादरविणारा दावा आहे. आपचे नेते व राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी भाजपचे देशभरात ऑपरेशन लोटस सुरू असल्याचे विधान सात खासदार फुटल्यानंतर केले आहे. त्यामुळे आपला आणखी लोकप्रतिनिधी फुटण्याची भीती असल्याचे या विधानावरून स्पष्ट होते.

Arvind Kejriwal
AAP MP split news : 'आप'चे 10 पैकी 7 खासदार फुटले; कोण तिघे केजरीवालांसोबत एकनिष्ठ? एकजण सर्वांना पुरून उरणारा, वाचा सर्वांची हिस्ट्री...

फुटलेल्या खासदारांपैकी सहा जण पंजाबचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे पंजाब सरकारही संकटात येण्याची भीती आता पक्षातील नेत्यांना वाटू लागली आहे. राज्यातील सरकार चांगले काम करत असताना भाजपने या खासदारांना फोडले असल्याचे संजय सिंह म्हणाले आहेत. भाजपने पुन्हा एका पंजाबी लोकांना धक्का दिल्याची पोस्ट केजरीवालांनी सोशल मीडियात केली आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com