Girish Mahajan, BJP Sarkarnama
मुंबई

व्हायरल 'ऑडीओ क्लिप'मुळे गिरीश महाजन अडचणीत!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची एक ऑडीओ क्लिप व्हायरल होत आहे. जिल्हा परिषद भरतीबाबत महाजन यांची विद्यार्थ्यासोबत झालेले संभाषणाचे एक ऑडीओ क्लिप सध्या व्हायरल झाले आहे. या क्लिपमध्ये महाजन हे विद्यार्थ्यांसोबत अर्वाच्य भाषेत बोलताना दिसत आहेत. यामुळे आता महाजनांची मोठी अडचण होण्याचे चिन्हे दिसत आहेत.

महाजन यांना एका विद्यार्थ्याने फोन लावून जिल्हा परिषद भरतीबाबत विचारणा केली होती. झेडपीची फाईल तुमच्याकडे आहे, त्या दृष्टीने काही करा, असे संबंधित विद्यार्थ्याचे म्हणणे होते. मात्र यावर बोलताना महाजन यांनी अर्वाच्य भाषेत विद्यार्थ्याशी उत्तर दिले. यामुळे आता त्यांच्यावर सर्व स्तरातून टिका होत आहे.

महाजन यांना फोन लावून विद्यार्थ्याने म्हंटले की, "साहेब झेडपीची फाईल तुमच्याकडे आहे. तेवढं बघा ना सर. मुलं खूप डिप्रेशन आहेत."यावर महाजन म्हणाले, तुम्हाला कामं नाहीत का रे काही. दिवसभरातून ५०० फोन करता. मी काही ते करत नाही. रद्द केली मी ते. "यानंतर विद्यार्थ्याने म्हंटले की, "अहो साहेब मुलं डिप्रेशनमध्ये आहे." तर यावरही महाजन म्हणाले की, रद्द केले ते, ठेव फोन.

फोनवर संभाषण होत असताना महाजन यांनी अत्यंत अर्वाच्य आणि आक्षेपार्ह भाषा वापरली. यामुळे आता महाजन यांच्यावर टीका होत आहे. यावर महाजन यांची प्रतिक्रीया अजूनही आलेली नाही. मात्र त्यांच्यावर विविध स्तरातून रोष व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT