मुंबई : भाजप नेते गिरीश महाजन यांच्या प्रकरणातील सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा आहे. सरकारने तो स्वीकारला. तसेच ही केस सीआयडीकडे सोपविण्याचा निर्णय राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत जाहीर केला.
गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना एका गुन्ह्यात अडकवून मोक्का लावण्याबाबत सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांनी रचनलेल्या षडयंत्राबाबतचे पुरावे पेन ड्राईव्हच्या माध्यमातून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधीमंडळात सादर केले होते. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. त्या प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे देणार असल्याचे सांगितले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पेनड्राईव्ह दिल्याबद्दल वळसे पाटील यांनी उल्लेख केला. मी कोणाची पाठराखण करणार नाही. हे सर्व प्रकरण तपासावे लागेल. या घटनेच्या मागे कोणी आहे, कोण दोषी आहे, हे पाहावे लागेल. आपण एकदा मुख्यमंत्री असताना राज ठाकरे यांना पेन ड्राईव्ह दिला. मागच्या अधिवेशनात पेन ड्राईव्ह या अधिवेशनात दोन पेन ड्राईव्ह दिले. फडणवीस यांनी डिटेक्विव्ह एजन्सी काढली का, असा टोला वळसे पाटील यांना फडणविसांना लगावला.
महाराष्ट्राच्या पोलिस दलाचा अभिमान आहे, असे विरोधी पक्षनेते म्हणतात. मात्र, ते या दलावर विश्वास न ठेवता प्रत्येक प्रकरण सीबीआय किंवा इतर एजेन्सीकडे देण्याचा आग्रह धरत असल्याचेही वळसे पाटील म्हणाले. प्रकरणाची चौकशी करणार, या प्रकरणामध्ये कोणालाही पाठिशी घालणार नाही. राज्य सरकार चौकशी करुन या प्रकरणातील सत्यता समोर येईल, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.