भाजपला आव्हान देत धनंजय मुंडेंनी सभागृहातच शड्डू ठोकला!

राष्ट्रवादी काँग्रेसने नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा विधानसभेतील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Jayant Patil, Dhananjay Munde
Jayant Patil, Dhananjay Mundesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विधानसभेमध्ये (Vidhan Sabha) जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) विदर्भ पाटबंधारे महामंडळाविषयी बोलत होते. मात्र, पाटील यांच्या विषयापेक्षा विधानसभेतील कॅमेऱ्यांनी जास्त लक्ष वेधले ते त्यांच्या मागे बसलेल्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे. मुंडे विधानसभेत हातवारे करत होते, काहीही न बोलता ते मोठा चर्चेचा विषय बनले आहेत.

जयंत पाटील बोलत असनाना मुंडे हे विरोधी बाकावरील भाजप नेत्यांना उद्देशून, हातवारे करून काहीतरी विचारना करत असल्याचे दिसत आहे. मुंडेंचे हातवारे एवढे बोलके होते की, त्यांचा प्रश्न कुणाच्याही सहज लक्षात येण्यासारखा होता. सभागृहात बॉम्ब फोडणार होते. काय झाले? बॉम्ब कुठे आहे, असा प्रश्न धनंजय मुंडे हे हातवारे करुन विचारत असल्याचे दिसत आहे. एवढ्यावरच न थांबता दंड थोपटून आपण कुठल्याही बॅाम्बसाठी तयार आहोत असे आव्हान ते देताना दिसत आहेत. धनंजय मुंडे यांनी हातवारे करून विचारलेल्या या प्रश्नांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये चांगलाच चर्चेत आहे.

Jayant Patil, Dhananjay Munde
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मोदींचा व्हिडिओ व्हायरल ; फडणवीसजी, उत्तर द्याल का?

बॉम्ब कुठे आहे?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात सत्ताधाऱ्यांवर आरोप करणारा पेनड्राईव्ह विधानसभेत सादर केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांची घरी जाऊन तब्बल दोन तास चौकशी केली. त्यानंतरही आगामी आठवड्यात आणखी एक बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा फडणवीस आणि इतर नेत्यांनी दिला होता.

Jayant Patil, Dhananjay Munde
सभागृहात पेन ड्राईव्ह, भंडाऱ्यातील ‘त्या’ महसूल अधिकाऱ्यावर कारवाई होणार?

त्यामुळे फडणवीस आज काय बोलतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र, फडणवीस यांनी आज अगदी काही मिनिटच घेतले आणि ते खाली बसले. त्यानंतर सभागृहात विरोधी पक्षांचा बॉम्ब कुठे आहे, कधी पडणार? असे प्रश्न खाणाखुणांनी, दबक्या आवाजातून विचारला जाऊ लागले. नेमके तेच धनंजय मुंडे यांचे सभागृहातील हातवारे कॅमेऱ्याने टिपले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com