sonia duhan sarkarnama
मुंबई

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या सोनिया दुहान यांना गोवा न्यायालयाकडून दिलासा

सोनिया धुहान या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत.

सरकारनामा ब्युरो

पणजी : बनावट आयडी वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनिया दुहान (sonia duhan)यांना गोवा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.शिवसेना बंडखोर आमदारांचे वास्तव्य असलेल्या गोव्यातील हॉटेलमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनिया दुहान यांना अटक करण्यात आली होती. (sonia duhan latest news)

सोनिया धुहान या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. वर्ष 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना गुरुग्राम येथील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी या आमदारांची सुटका करण्यात सोनिया दुहान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सोनिया धुहान आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची सुखरुपपणे सुटका केली होती. त्यामुळे सोनिया धुहान यांनी गोव्यातही हाच प्रयत्न केला होता का, अशी चर्चा होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT