मोठी बातमी! काँग्रेस आमदाराच्या घरावर ACB चे छापे

ACB|ED : ‘एसीबी’चे पथक कागदपत्रांची पडताळणी करीत असून तपास सुरू आहे.
ACB trapp, Congress Party News, ACB Action on Congress MLA, Bangalore News
ACB trapp, Congress Party News, ACB Action on Congress MLA, Bangalore NewsSarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) अहवालानंतर कर्नाटकातील (Karnataka) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज काँग्रेस आमदार बी. झेड. जमीर अहमद खान यांच्या निवासस्थानासह पाच ठिकाणांवर छापे टाकले आहेत.(Congress Party Latest Marathi News)

ACB trapp, Congress Party News, ACB Action on Congress MLA, Bangalore News
कोणाच्या खास प्रेमाची गरज नाही... शिवसेनेचाच व्हीप अधिकृत : आदित्य यांची थेट भूमिका

कॅन्टोन्मेंट रेल्वेस्थानकाजवळील त्यांच्या निवासस्थानावर, सिल्व्हर ओक अपार्टमेंटमधील फ्लॅट, सदाशिवनगर येथील गेस्ट हाउस, बनशंकरी येथील जी. के. असोसिएट्सचे कार्यालय आणि शहरातील कलासिपल्यातील नॅशनल ट्रॅव्हल्सच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले.‘एसीबी’चे पथक कागदपत्रांची पडताळणी करीत असून, तपास सुरू आहे, असे ‘एसीबी’च्या अधिकाऱ्याने सांगितले.

ACB trapp, Congress Party News, ACB Action on Congress MLA, Bangalore News
कोथरूडचा कुख्यात गुंड शरद मोहोळ तडीपार; पुणे पोलिसांनी दिला आदेश

दरम्यान चार वेळा आमदार राहिलेल्या खान यांनी एच. डी. कुमारस्वामी सरकारमध्ये जून २०१८ पासून अन्न व नागरी पुरवठामंत्री म्हणून वर्षभर काम केले होते.

हेही वाचा : पुणे महापालिकेत खळबळ; उपायुक्तांसह पत्नी ACB च्या जाळ्यात

तब्बल एक कोटी रुपयांची अवैध अपसंपदा जमविल्या प्रकरणी पुणे महानगर पालिकेच्या उपायुक्तांसह त्यांच्या पत्नीवर कोथरूड पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) गुन्हा मंगळवारी (ता.५ जुलै) दाखल करण्यात आला आहे. उपायुक्तांच्या (Deputy Commissioner) घराची मंगळवारी सकाळपासून झाडाझडती सुरू आहे.

महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त विजय भास्कर लांडगे (वय ४९) त्यांच्यासह त्यांच्या पत्नी शुभेच्छा विजय लांडगे (वय ४३) पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक भारत साळुंखे यांनी तक्रार दिली आहे.

लांडगे आणि त्यांच्या पत्नीने तब्बल एक कोटी २ लाख ६० हजार रुपयांची अपसंपदा जमवल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने याची तपासणी केली असल्याने यात तथ्य असल्याचे आढळले. या प्रकरणी आज सकाळ पासून त्यांच्या घरावर धाड टाकण्यात आली असून अधिकारी तपास करत आहे. सर्व खात्री झाल्यावर लांडगे यांनी तब्बल ३१ टक्के अपसंपदा पत्नीच्या नावे जमा केल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एसीबीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक शीतल घोगरे करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com