Vinod Tawde Sarkarnama
मुंबई

Gopal Shetty: इरेला पेटलेल्या गोपाळ शेट्टी यांची तलवार म्यान; बोरिवलीमधील बंड विनोद तावडे यांनी शमवलं..

Gopal Shetty candidature Withdraw from Borivali: मी आमदार बनण्यासाठी लढत नाही आहे. मला दुसऱ्या पक्षांकडून देखील ऑफर होत्या. मात्र मला तसं करायचं नव्हतं. मी लढाई विशिष्ट कार्यपद्धतीसाठी होती," असे शेट्टी यांनी अर्ज माघार घेतल्यानंतर माध्यमांना सांगितले.

Mangesh Mahale

Borivali Vidhan Sabha Election: महाविकास आघाडी आणि महायुतीत अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली असून अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. बंडखोरांचे बंड शांत करण्यासाठी नेत्यांची धावपळ सुरु आहे.

मुंबईत भाजपचे बंडखोर उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजपचे नेते विनोद तावडे यांनी शेट्टी यांची त्यांच्या घरी भेट घेतल्याने शेट्टी यांनी माघार घेतली असून तावडे यांच्या शिष्टाईला यश आले आहे.

बोरिवलीतून गोपाळ शेट्टी, अंधेरीतून स्विकृती शर्मा यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. 'होय, मी माघार घेतोय, मी आमदार बनण्यासाठी लढत नाही आहे. मला दुसऱ्या पक्षांकडून देखील ऑफर होत्या. मात्र मला तसं करायचं नव्हतं. मी लढाई विशिष्ट कार्यपद्धतीसाठी होती," असे शेट्टी यांनी अर्ज माघार घेतल्यानंतर माध्यमांना सांगितले. बोरिवलीतून गोपाळ शेट्टींनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता.

गोपाळ शेट्टी म्हणाले, "गोपाळ शेट्टी करतोय तर करु द्या, काय फरक करतो असं आमच्या पक्षात नाही. सर्व पक्षश्रेष्ठी मला भेटायला आले होते. माझं म्हणणं मी श्रेष्ठींना सांगितलं. बाहेरचा उमेदवार आणू नये, असे मी मूळीच म्हणत नाही आहे. मात्र हे सातत्याने झाल्याने मला हे करावं लागलं," असे स्पष्टीकरण गोपाळ शेट्टी यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT