Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekarsarkarnama

Pune Congress : बंडखोर नॉट रिचेबल अन् उमेदवार झाले हँग! रवींद्र धंगेकर यांची डोकेदुखी वाढली...

Kasba Assembly Election 2024: कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कमल व्यवहारे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यांचे समजूत काढण्यासाठी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह अंकुश काकडे यांनी त्यांची भेट घेतली आहे.
Published on

Pune News: विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेला अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरांना शांत करण्याची शेवटची संधी साधण्याचा प्रयत्न सगळ्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आणि उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

शेवटचा दिवस असल्याने आपल्यावर वरिष्ठ मंडळी आणि उमेदवार विविध पद्धतीने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणू शकतात, म्हणून बंडखोर आपला फोन बंद करून नॉटरिचेबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने उमेदवार आणि पक्षाचे नेते हँग झाले आहेत.

यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीन तीन पक्ष एकत्रित आल्याने नाराजांची संख्या वाढली आहे. इच्छुक असताना उमेदवारी न मिळाल्याने तसेच मतदार संघ मित्र पक्षाला सुटल्याने नाराज असलेले नेत्यांनी पक्षाची बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. या बंडोबांना थंड करण्यासाठी पक्षाकडून विविध यंत्रणा कार्यान्वित करण्यात आले असून या बंडोबांना थंड करण्यात काही पक्षांना यश आलं आहे.

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास महायुतीला सर्व विधानसभा मतदारसंघात बंडखोरी रोखण्यात तसेच नाराजांची समजूत देखील काढण्यात यश आले आहे.पुण्यात काँग्रेस पक्षाकडून सर्वाधिक बंडखोरी पाहायला मिळत आहे. कसबा, शिवाजीनगर आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातून कॉग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस हे अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही.

Ravindra Dhangekar
Manoj Jarange: मोठी बातमी; मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीतून माघार ; लढणार नाही, पाडणार VIDEO पाहा

कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी महापौर कमल व्यवहारे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यांचे समजूत काढण्यासाठी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे यांनी त्यांच्याशी भेट घेतली आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कमल व्यवहारे ह्या फोन बंद करून नॉटरिचेबल झाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांची डोकेदुखी वाढल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे पर्वती विधानसभा मतदारसंघातून देखील काँग्रेसची ज्येष्ठ नेते आबा बागुल हे निवडणूक लढण्यावर ते ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपण उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही असा त्यांनी पण केला असल्याचा पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुण्यातील बंडखोरी सामावण्यात काँग्रेस पक्षाला सध्या तरी यश मिळताना पाहायला मिळत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com