Gopal Shetty Eknath Shinde
Gopal Shetty Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Gopal Shetty : मुख्यमंत्र्यांच्या ओळखीचे म्हणून एक कोटीचे बक्षीस; इतरांना वेगळा न्याय का? भाजप खासदार शेट्टींचा सवाल!

सरकारनामा ब्युरो

Gopal Shetty : भाजपच्या खासदारानेच आता राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत भाजपला घरचा आहेर दिला आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला . भाजपच्या बड्या नेत्यानेच राज्यात सरकारमध्ये असलेल्या भाजपवर टीका केल्याने, भाजप अंतर्गत खळबळ माजली आहे.

गोपाळ शेट्टी एका कार्य़क्रमात बोलताना म्हणाले की, "केवळ मुख्यमंत्र्यांची पत्नी यांच्या ओळखीचे आहेत म्हणून मुलीने कबड्डीत सुवर्णपदक पटकावल्यामुळे, त्यांना तब्बल एक कोटी रुपये देण्यात आले. जर एखाद्या कबड्डी खेळाडूची ओळख मुख्यमंत्री यांच्या पत्नीशी नसेल तर त्याला काहीही देऊ नये. ही अशी कशी व्यवस्था आहे? ही कोणती व्यवस्था आहे?" असा परखड प्रश्न शेट्टींनी उपस्थिती केला.

शेट्टी पुढे म्हणाले,"कुणाल केरकर या आपल्या कार्यकर्त्याला बोरिवलीत एक व्यायामशाळा बांधून दिले होते. व्यायामशाळा योग्य प्रकारे योग्य प्रकारे चालत होती. मागील मविआ सरकरात ही व्यायामशाळा बंद पाडण्यात आली होती. भाजपच्याच नगरसेविका बिना दोशी, आपले आमदार, बोरिवली मंडलचे अध्यक्ष आणि उत्तर मुंबई भाजपचे पदाधिकारी यांनीसुद्धा काही केलेले नाही. यामुळे व्यायामशाळेची जागा हातातून सुटली. भाजपचेच नेते कार्यकर्ते साहाय्य करणार नसेल तर तुमच्यासोबत कोण काम करणार, " असे शेट्टी म्हणाले.

मनसेच्या एका कार्यकर्त्यामुळे आपल्या कामात अडथळे निर्माण होत होते. यामुळेच व्यायामशाळाचे काम केले होते. व्यायामशाळेच्या उद्धाटनाला भाजपचेचे कार्यकर्ते हजर नव्हते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

बोरिवलीत मतदारसंघात बाहेरच्या माणसाला भाजपने तिकीट दिले. इथे मात्र भाजपचे कार्यकर्ता 20 ते 30 वर्ष पक्षासाठी काम करत आहेत. बाहेरच्या लोकांना तिकीट पण भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना मान सन्मान नाही अशी परिस्थिती आहे. बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार सुनील राणे यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांनी टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT