Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Government Job : सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूषखबर ; 40 हजार पदांची भरती करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : सरकारी नोकरींच्या बाबतीत आता मोठी बातमी समोर येत आहे. राज्यभरातील सर्वच महानगरपालिका (Municipal Corporation), नगरपरिषदा (Nagar Parishad) व नगरपंचायतींमध्ये (Nagar Panchayat) ४० हजार नोकऱ्यांचे विविध पदांच्या भरतीबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले.

राज्यभरातील सर्वच महानगरपालिका, यासोबतच 'अ' वर्ग नगरपालिका यांच्या मुख्याधिकाऱ्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी भरतीाबाबतचे निर्देश दिले आहे. मुंबई पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, नगरविकास विभाग अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल हे ही बैठकीत हजर होते.

तब्बल 40 हजार पदांच्या भरतीचे निर्देश :

राज्यातील सर्वच महानगरपालिका, नगरपरिषदा, पंचायती यामध्ये 55 हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. राज्यपातळीवर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किमान 40 हजार विविध पदांबाबतची भरतीसाठीची प्रक्रिया जलदगतीने सुरू करण्यात यावे, असा आदेश मुख्यंत्र्यांनी यावेळी दिला. यात राज्य संवर्गाचे एकूण 1983 पदे संचालनालयाकडून आणि नगरपरिषद - नगरपंचायत पातळीवरील संवर्गात गट 'क' आणि गट 'ड' यामध्ये एकूण 3720 पदांची भरती होणार आहे. याबाबतची प्रक्रिया एकूण 34 जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत निवड समितीच्या वतीने पार पडण्यात येणार आहे.

तसेच, मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 8490 पदांबाबत भरतीची प्रक्रिया सुरु केलेली असून, या भरतीच्या प्रक्रियेसबंधी कार्यवाही सुरू करुन, मे महिन्याच्या अखेरपर्यंतच्या मुदतीत संपूर्ण भरती करण्याबाबतचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. रिक्त जागांबाबत आढावा घेत, सगळ्या बाबी पूर्ण करुन, भरती प्रक्रिया लगोलग सुरू करण्याचे आदेश आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT