Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Devendra Fadnavis-Uddhav ThackeraySarkarnama

Devendra Fadnavis News: "मंत्री जेलमध्ये असूनही राजीनामा नाही, म्हणून आम्ही मंत्र्यांनाच बदललं!"

Devendra Fadnavis : वर्क फ्रोम होम आपण पाहिलं होतं, वर्क फ्रोम जेल सुद्धा आपण पाहिलं.
Published on

Devendra Fadnavis In Amravati: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज पुन्हा एकदा विरोधाकांवर हल्लाबोल केला आहे. मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांमध्ये एवढी हिम्मत नव्हती की, त्यांचा राजीनामा घ्यावा. शेवटी आपल्याला सरकार बदलून, मंत्रीच बदलावे लागले, अशा शेलक्या शब्दात फडणवीसांनी टीका केली. ते आज अमरावतीत पदवीधर जागेच्या निवडणूक प्रचारसभेत बोलत होते.

फडणवीस म्हणाले, "आपले उमेदवार रणजित पाटील यांनी पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज दाखल केला. गेली १२ वर्षे ते इथून काम करतायेत. ते एक ऑर्थोपेडीक सर्जन आहेत. त्यांना राजककीय क्षेत्रात काम करण्याची तळमळ आहे. त्यांनी अभाविप भाजपचं काम सुरू केलं. आपण त्यांना पदवीधर मतदारसंघातून उमेदवीरी दिली. मी मुख्यमंत्री असताना, माझ्याकडे जेवढी खाती होती, त्या खात्यांचं सचिवाची जबाबदारी पाटील यांनी पार पाडली. "

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Teacher Constituency Election News: अखेर भाजपचं ठरलं, नागो गाणार लढणार नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक

"सहा महिन्यांपूर्वी आपलं सरकार आलं. मात्र मागील अडीच वर्षात सरकार बंदीस्त होतं. ते फेसबुक वर ते लाईव्ह होतं आणि जनतेमध्ये डेड होतं. जनतेमध्ये सरकार कुठे दिसायचंच नाही. मागील सरकारची वसुलीच दिसायची, मंत्र्यापासून ते अधिकारी जेलमध्ये गेले. वर्क फ्रोम होम आपण पाहिलं होतं, त्या सरकारमध्ये वर्क फ्रोम जेल सुद्धा आपण पाहिलं. मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांमध्ये एवढी हिम्मत नव्हती की, त्यांचा राजीनामा घ्यावा. शेवटी आपल्याला सरकार बदलून मंत्रीच बदलावे लागले," असेही फडणवीस म्हणाले.

"पाच वर्ष आपलं सरकार होतं, तेव्हा विदर्भाचा विकास आपल्या अजेंड्यावर होता. अनेक योजना आपण या ठिकाणी आणले. मागील अडीच वर्षात उद्योजक त्या सरकारचा त्रासे भोगत होते. आज मी उद्योजकांना आश्वस्त केलंय, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही गुंतवणूकदार आहात, तुम्हाला त्रास होऊ देणार नाही," असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
'मुख्यमंत्री ठाकरे 'वर्क फ्रॉम होम' बरोबर 'वर्क फ्रॉम जेल' देणार असतील तर त्यांना धन्यवाद'

"विदर्भ मराठवाड्याला अडीच वर्षात निधीच मिळाला नाही. ज्या ज्या वेळी काँग्रेस - राष्ट्रवादीचं सरकार येतं, तेव्हा तोंडाला पानं पुसली जातात.आपल्या हक्काचं वैधानिक विकास महामंडळाची हत्या करण्यात आली. आज आपण नव्याने महामंडळ तयार करत आहोत," असा दावाही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com