Girish Mahajan
Girish Mahajan  Sarkarnama
मुंबई

Girish Mahajan : यांची मोठी घोषणा : वैद्यकीय शिक्षण घेतलेल्यांसाठी गुड न्यूज

सरकारनामा ब्युरो

Girish Mahajan : राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (medical education minister girish mahajan) यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

राज्य सरकार लवकरच सार्वजनिक आरोग्य विभागात येत्या काही महिन्यांत 10,127 पदांसाठी मेगा भरती (Mega Recruitment) करणार आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि लॅब टेक्निशियन अशा अनेक पदांसाठी भरती केली जाणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

या भरतीची जाहिरात 1 ते 7 जानेवारीदरम्यान प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर परीक्षा आणि मुलाखतीचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे देखील गिरीश महाजन यांना सांगितलं. महाजन यांच्या घोषणेमुळे मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

कंत्राटी कामगारांना प्राधान्य

कोविड काळात राज्यात मागील दोन ते अडीच वर्षात कंत्राटी कामगार म्हणून वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना आरोग्य विभागाच्या भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. दरम्यान, याआधी नुकतेच राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection) मधील प्रवेश परीक्षांचे आउटसोर्सिंग करून वर्ग B, C आणि D च्या ग्रेडमधील अंदाजे 75,000 रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर आता महाजन यांची ही नव्या भरतीची घोषणा झाली.

मेगाभरतीचं नियोजन…

  • 1 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान जाहिरात प्रसिद्ध होणार.

  • 25 ते 30 जानेवारी 2023 अर्जांची छाननी होणार.

  • 25 फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षा घेण्यात येणार.

  • 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2023 पात्र उमेदावारांची यादी जाहीर होणार.

  • 25 फेब्रुवारी ते 26 मार्च 2023 परीक्षा होतील.

  • 27 मार्च ते 27 एप्रिल 2023 पर्यंत निवड झालेल्या उमेदवारांच्या हातात नियुक्तीपत्रक देणार.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT