Eknath Shinde News : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राखीव ठेवला आहे. न्यायालयातील निकाल कधीही येवू शकतो, अशी परिस्थिती आहे. त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर शिवसेना (शिंदे गट) आमदार भरत गोगावले (Bharat Gogawle) यांनी स्पष्ट उत्तर दिले. सरकारला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. आयोध्या दौऱ्यावर जाण्याच्या आधी मुंबईमध्ये भरत गोगावले यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भरत गोगावले म्हणाले, ठिक आहे, आम्ही किती लोक अपात्र ठरणार आहोत. तर १६ जण अपात्र ठरु, आम्ही सोळा जण जरी अपात्र ठरलो तरी सुद्धा सरकारला कोणताच धोका नाही.
कारण, आमच्याकडे आमचे ४० आमदार आहेत. तसेच अपक्ष १० लोक आहेत. ५० आमदार आहेत, त्यातील १६ आमदार अपात्र ठरले तरी सुद्दा ३५ जण राहतात. तसेच भाजपकडे ११५ आमदार आहेत. त्यामुळे आमच्याकडे १५० जणांचे बहुमत आहे. त्यामुळे सरकारला कोणताही धोका नाही. विरोधकांना वाटत असेल की सरकार पडणार आहे, तर तसे काही होणार नाही, असा विश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत. ते काम करणारे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सगळे सुरळीत होईल, असा आम्हाला आत्मविश्वस आहे, असे गोगावले म्हणाले. दरम्यान, राज्यातील सत्तासंघार्षावर सर्वोच्च न्यायालयात नऊ महिने सुनावणी झाली. त्यामध्ये सुरुवातीला दोन न्यायामुर्तींसमोर त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली.
त्यानंतर त्यांनी राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण पाच न्यायामुर्तींच्या खंड पीठाकडे पाठवले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पाच सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यामध्ये दोन्ही बाजूच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तीवाद केला. दोन्ही गटांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखीव ठेवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.