Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : जुन्या पेन्शनसाठी सरकारची मोठी घोषणा; मुख्यमंत्री शिंदेंचं कर्मचाऱ्यांना आवाहन

Old Pension Scheme : शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यामुळे जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा तापला

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे. तसेच राज्यभर आंदोलनही केलं आहे. शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यामुळे जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा चांगलाच तापला आहे.

'एकच मिशन, जुनी पेन्शन' या घोषवाक्याखाली शासकीय कर्मचाऱ्यांनी आज दिवसभर विविध ठिकाणी आंदोलन केलं. यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत याविषयीचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

तरी देखील शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप सुरूच ठेवला आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच यामध्ये आरोग्य कर्मचारीही सहभागी झाल्यामुळे रुग्णांनाही त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

या पार्श्वभूमीवरच जुनी पेन्शन योजनेबाबत विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन केलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ''सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक आहे. यासाठी वेगळी समितीही स्थापन करण्यात आली आहे. यावर समिती अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करेल''.

''त्यामुळे जुन्या पेन्शनसाठी संप पुकारलेल्या कर्मचाऱ्यांना माझं आवाहन आहे की त्यांनी हा संप मागे घ्यावा. यावर चर्चेतूनच मार्ग निघेल. सरकारची भूमिका ही नकारात्मक नाही. त्यामुळे या विषयावरील मार्ग हा चर्चेमधूनच काढावा लागणार आहे''.

''यामध्ये कर्मचारी आणि संघटनेच्या अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. या संपाचा आरोग्य विभागाच्या कामावर परिणाम होऊ नये, तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी माझी विनंती आहे की संप मागे घ्यावा'', असंही शिंदे यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT