Patan News: पाटणला मोर्चात पोलिस, आंदोलकांत झटापट; पाटणकरांचे पालकमंत्र्यांवर आरोप

Satyajeet Patankar सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, कदाचित पाटण तालुक्यात कोणताही प्रश्न असला तरी त्याला राजकारणाच रूप दिले जाते. त्यांना वाटत असेल कि त्यांच्या पार्टीच्या लोकांचे नुकसान होत नाही.
Patan Morcha
Patan Morchasarkarnama
Published on
Updated on

Patan News : मानवी हक्क संरक्षण समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे गट यांच्यावतीने शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आज पाटण प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. निवेदन स्विकारण्यासाठी प्रांताधिकारी लवकर न आल्याने राष्ट्रवादीचे नेते सत्यजित पाटणकर Satyajeet Patankar, राजाभाऊ शेलार RajaBhau Shelar यांनी पोलिसांचा बंदोबस्त धुडकावून थेट प्रांताधिकारी कार्यालयात धडक मारली. त्यामुळे पोलिस आणि आंदोलकांत झटापट झाली‌. यावेळी प्रशासनाच्या नावाने आंदोलकांनी शंखध्वनीही केला.

पाटण तालुका मानवी हक्क संरक्षण समितीच्या वतीने आज प्रांताधिकारी कार्यालयावर सर्व पक्षीय पदाधिकारी, मानवी हक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी, शेतकरी यांचा धडक मोर्चा काढण्यात आला. जंगली प्राण्यांच्याकडून होणाऱ्या नुकसानीची बाजारभावाप्रमाणे भरपाई लवकरात लवकर मिळावी, शेतकऱ्यांना न्याय मिळावा, पाटण तालुक्यावर लादण्यात आलेल्या कोअर झोन, बफर झोन, कॉन्झरव्हेटीव झोन, पश्चिम घाट प्रकल्पाच्या जाचक अटी रद्द कराव्यात आदी मागणी केली.

यावेळी सत्यजित पाटणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटणकर म्हणाले, कदाचित पाटण तालुक्यात कोणताही प्रश्न असला तरी याला राजकारणाच रूप दिले जाते. त्यांना वाटत असेल कि त्यांच्या पार्टीच्या लोकांचे नुकसान होत नाही. त्यांच्या पक्षाचा ऊस, मका, ज्वारी, भुईमूग आदी पिकांना डुकरे त्रास देत नसतील, म्हणून ते या प्रश्नी मदत मागत नसतील.

परंतु तालुक्याच्या भवितव्यासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकारण न करता लोकप्रतिनिधींनी सुद्धा हा प्रश्न विधानसभेत मांडावा. यातून काहीतरी मार्ग काढावा. या ठिकाणी गेल्या दोन तासांपासून सर्व शेतकरी उन्हातून मोर्चाचे काढत आहेत. आज या ठिकाणी उपस्थित असताना आम्ही अर्धा तास झाले उन्हात थांबले आहोत.

Patan Morcha
Patan : ठाकरे सेनेच्या महाप्रबोधन यात्रेचा मायनस शून्य टक्के परिणाम होईल : देसाई

परंतू निवेदन देत असताना अधिकाऱ्यांनी विलंब केला, त्यावरून गोंधळ झाला. सर्वाना माहिती आहे की, तालुक्याचे राजकारण कोणत्या थराला गेले आहे, असेही श्री. पाटणकर यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी पालकमंत्री देसाई यांच्यावर आरोप केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com