Bhagat Singh Koshyari Sarkarnama
मुंबई

राज्यपालांनी ठाकरे सरकारला खिंडीत पकडलयं...

मनुकुमार श्रीवास्तव यांना नोटीस बजावून याबात खुलासा मागविला आहे

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेत (Shivsena) बंड झाल्यानंतरच्या दोन दिवसांत राज्य सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना नोटीस बजावून याबात खुलासा मागविला आहे.

गेल्या आठवड्यात २२, २३ आणि २४ जून या दिवशी राज्य शासनाच्या वतीने शासन निर्णय, परिपत्रके जरी करण्यात आली. सुमारे १६० पेक्षा जास्त निर्णयांचे आदेश शासनाने जरी केले आहेत. मात्र, सरकारने अत्यंत घाईघाईत हे निर्णय जरी केले असल्याबाबत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी याबाबत राज्यपालांकडे २४ जून रोजी तक्रार केली होती.

हे सर्व आदेश संशयास्पदरित्या केलेले असल्याचा दरकार यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान रिकामे केले म्हणजे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याचा त्यांचा मानस असल्याचे स्पष्ट होते, अशा परिस्थिती एकढ्या मोठ्या प्रमाणार शासन निर्णय जरी करणे म्हणजे जनतेच्या पैशाचा गैरवापर होण्याची शक्यता, दरेकर यांनी यातून व्यक्त केली होती. दरेकर यांच्या या तक्रारीची दाखल घेऊन राज्यपालांनी याबाबत कारणमीमांसा स्पष्ट करण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT