डोंबिवलीत शिवसेनेच्या दोन गटांत वाद : शाखेतून शिंदे समर्थकांना हटकले

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवलीत शिवसेनेच्या दोन गटांत वाद झाला.
Shivsena Dombiwali
Shivsena DombiwaliSarkarnama

डोंबिवली - राज्यात शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवलीत शिवसेनेचे दोन गट समोरा-समोर आले. त्यामुळे डोंबिवलीतील शिवसेनेच्या शहर शाखेला काही काळ पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. Shivsena News Update

शिवसेनेचे नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडल्याचे दिसत आहे. डोंबिवलीमधील शिवसैनिकांनी याविषयी आतापर्यंत शांततेची भूमिका घेतली होती. मात्र आज (सोमवारी) शिंदे समर्थक गटाने सकाळी राऊत यांचा पुतळा जाळत निदर्शने केली. त्यानंतर ठाकरे समर्थकांनी डोंबिवली शहर शाखेतील एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो उतरविले. याची कुजबुज लागताच शिंदे गटाने शाखेत शिरून इतर सैनिकांना जाब विचारला. यावरून दोन्ही गटात बाचाबाची झाली. पक्षातील वरिष्ठांनी व पोलिसांनी देखील वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद निवळला. यावेळी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या पुढे आल्याने शिंदे गटाने तेथून नंतर काढता पाय घेतला.

Shivsena Dombiwali
एकनाथ शिंदे गट मनसेत सामील होणार?; राजू पाटलांनी स्पष्टच सांगितलं

डोंबिवली पूर्वेत शिवसेनेची शहर शाखा असून या शाखेतूनच कल्याण, डोंबिवली, ग्रामीण भागाचा सर्व सूत्र हलतात. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय देखील याच शाखेत थाटले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर कुठे खासदार शिंदे यांचे कार्यालय फोडले गेले तर कुठे शिंदे समर्थनार्थ बॅनर लागले. त्यानंतर अनेक शिवसैनिकांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठिंबा दिला.

डोंबिवलीतील शिवसैनिक मात्र शांततेच्या भूमिकेत होते. मात्र सोमवारी शिंदे समर्थक गटाने संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करत निषेध नोंदवत शिंदे यांना पाठिंबा दर्शविला. त्यानंतर दुपारी डोंबिवली शहर शाखेत शिंदे समर्थक राजेश कदम, सागर जेधे आणि अन्य काही जण बसण्यास आले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले उपशहर प्रमुख विवेक खामकर यांनी त्यांना कार्यालयात बसण्यास कडाडून विरोध करून बाहेर हटकले. यामुळे तेथे खूप गोंधळ झाला आणि कार्यालयातील सीसीटिव्हीच्या आधारे अनेक शिवसैनिकांच्या हालचाली शिंदे गटाला कळत होत्या.

Shivsena Dombiwali
संजय राऊतांच्या घरातच शिवसेना फुटली? भाऊ सुनिल राऊत गुवाहटीला जाण्याच्या तयारीत...

ही गोष्ट शिवसैनिकांनी हेरून कल्याण-डोंबिवली महानगर संघटक वैशाली दरेकर, विधानसभा संघटक कविता गावंडे, शहर संघटक मंगला सुळे, किरण मोंडकर, शिल्पा मोरे, सीमा आयर, ममता घाडीगावकर, प्रकाश तेलगोटे, श्याम चौगुले, अभय घाडीगावकर आदींनी प्रथम शाखेतील सीसीटिव्ही काढून टाकले. त्यामुळे शिंदे गटाला शाखेतील माहिती मिळणे बंद झाले. तसेच शिंदे यांच्यामुळे ठाकरे परिवारासह समस्त निष्ठावंत शिवसैनिक यांना मोठा धक्का बसल्याने डोंबिवलीतील चिडलेल्या महिला आघाडीने शाखेत लावलेले एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे फोटो काढून खासदार कार्यालयातील मुलांकडे दिले.

ही बाब शिंदे समर्थकांना कळताच योगेश जुईकर यांसह दोन ते तीन जण शाखेत आले आणि त्यांनी फोटो कोणी काढला. याचा जाब विचारला. त्यावेळी उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. अखेर रामनगर पोलिसांनी मध्यस्थी करून त्या समर्थकांना बाहेर काढले. तेव्हा महिला आघाडी यांनी 'उद्धव ठाकरे आगे बडो हम तुम्हारे साथ है', अशा घोषणा देवून मध्यवर्ती कार्यालय दणाणून सोडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com