Gram Panchayat Election sarkarnama
मुंबई

Palghar Gram Panchayat : उद्या 6690 उमेदवार आपलं नशीब आजमावणार

सरकारनामा ब्युरो

पालघर : पालघर जिल्ह्यात उद्या (रविवार) 342 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक (Palghar Gram Panchayat Elections 2022) होत आहे. जिल्ह्यातील तब्बल सात लाख 69 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत . ही ग्रामपंचायत निवडणूक भाजप आणि शिंदे गट एकत्र लढवत आहेत. (Palghar Gram Panchayat Elections 2022 latest news)

दहा सरपंचांची बिनविरोध निवड झाली आहे. एक ग्रामपंचायत वर सरपंच पदासाठी एक ही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने 331 सरपंच पदांसाठी निवडणूक पार पडणार आहे . यातील 131 जागांसाठी 1339 उमेदवार रिंगणात आहेत.

3490 सदस्य जागांपैकी 712 सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याने 2729 जागांसाठी 6690 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी 171 झोनमध्ये 1332 मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. 1494 कर्मचारी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कार्यरत असणार आहेत.

बोईसरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनच्या बांधकामांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर कारवाईसाठी पालघरच्या तहसीलदारांकडून काही दिवसापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

विरोधी पक्षातील बोईसरच्या माजी उपसरपंचासह चार ते पाच उमेदवारांना या नोटिसा मिळाल्या आहे. सत्ताधारी पक्षातील सरपंच पदाच्या शर्यतीत असलेला उमेदवार आणि सरकारी जमिनीवरील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या चाळ माफियाला कारवाईतून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भाजप आणि शिंदे गटातील उमेदवारांना महसूल विभाग झुकते माप देऊन पक्षपात करीत असल्याचा आरोप केला जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सुरू असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या दबावतंत्रामुळे शिवसैनिकांसह विरोधी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारच्या साम-दाम-दंड भेद नीतीला झुगारून निवडणुकीला खंबीरपणे सामोरे जाण्याचा निश्चय विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT