ठाकरेंच्या हातातील 'मशाल' ही जाणार ? ; समता पार्टीची उच्च न्यायालयात धाव

Andheri By election : समता पार्टीने आक्षेप घेतल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (uddhav thackeray) आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील संघर्षामुळे अंधेरी विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी तर भाजप-शिंदे गटाकडून मुरजी पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (Andheri By election latest news)

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या चिन्हांचे वाटप केले आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ’ हे नाव मिळाले आहे. तर,शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले आहे. ठाकरे गटाला ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह तर, शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह देण्यात आलं होते.पण ठाकरे गटाच्या चिन्हावर समता पार्टीने आक्षेप घेतल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.

समता पार्टी आज (शनिवारी) ठाकरे गटाच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. मात्र, ही याचिका दिल्ली उच्च न्यायालय ऐकून घेणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर समता पार्टी ने हे चिन्ह त्यांच्या पक्षाचं असल्याचा दावा केला आहे.

निवडणूक आयोगाने समता पक्षाला unrecognised party जाहीर केलं आहे. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मशाल चिन्ह आमच्या पार्टीचे असल्याचा दावा समता पार्टीने केला आहे. त्यामुळे अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाला चिन्ह देऊ नये, अशी याचिका समता पार्टी दाखल करणार आहे. याबाबतची तक्रार यापूर्वी समता पाटीने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Uddhav Thackeray
MNS : अमित ठाकरे म्हणाले, "मी राज ठाकरे यांचा मुलगा नसतो तर राजकारणात..."

"निवडणूक आयोगाला आम्ही पक्षाचा पूर्ण खर्च सादर करत आलो आहोत. बिहार विधानसभा पोटनिवडणुकीत दोन जागांवर उमेदवार दिल्याचा दावा समता पार्टीच्या अध्यक्षांनी केला आहे. "निवडणूक आयोगाने आमचं म्हणणं न ऐकूण घेताच ठाकरे गटाला आमचं चिन्ह दिलं आहे," असे समता पार्टीनं याचिकेत म्हटलं आहे. निवडणूक आयोगात पक्षाची नोंदणी असल्याचा दावा समता पार्टीने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com