Gram panchayat Election News Sarkarnama
मुंबई

Gram Panchayat Election : आता धुरळा 7751 ग्रामपंचायत निवडणुकींचा ; अर्ज दाखल करण्यास सुरुवात!

Gram Panchayat Election : नेत्यांची व कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला.

सरकारनामा ब्यूरो

Gram Panchayat Election : महाराष्ट्रात आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा धुरळा उडणार आहे. राज्यातल्या 7751 ग्रामपंचायतींचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या निवडणुकीत विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात सर्वाधिक धुरळा उडणार आहे. या जिल्ह्यात भाजप नेते पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप क्षीरसागर यांच्यातला संघर्ष पुन्हा एकदा दिसणार आहे. 28 नोव्हेंबर पासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार तर 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 20 डिसेंबरला मतमोजणी होऊन, निकाल जाहीर होणार आहेत.

ग्रामपंचायत निवडणुका राजकीय पक्षांच्या चिन्हावर होत नाही. पण या निवडणुकीत काही ठिकाणा राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरेंसोबत राहिलेले आमदार कैलास पाटील यांच्या गावातील लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. तर बीडमध्ये संदीप क्षीरसागर आणि त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत थेट किंवा प्रत्यक्ष राजकीय पक्ष जरी उतरत नसले तरी, त्या त्या गावातील स्थानिक नेत्यांची व कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींच्या निवडणुका ?

बीड - 704

औरंगाबाद - 219

अहमदनगर - 203

अकोला - 266

अमरावती - 257

भंडारा - 363

बुलढाणा - 279

चंद्रपूर - 59

धुळे - 128

गडचिरोली - 27

गोंदिया - 348

हिंगोली - 62

जळगाव - 140

जालना - 266

कोल्हापूर - 475

लातूर -352

नागपूर - 237

नंदुरबार - 123

उस्मानाबाद - 166

पालघर - 63

परभणी -128

पुणे - 221

रायगड - 240

रत्नागिरी - 222

सांगली - 452

सातारा -319

सिंधुदुर्ग - 325

सोलापूर - 189

ठाणे - 42

वर्धा - 113

वाशिम - 287

यवतमाळ - 100

नांदेड - 181

नाशिक - 196

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT