पुणे : राज्यातील सत्तातरानंतर झालेल्या साडेसात हजार ग्रामपंचायतीच्या निकाल काल (मंगळवारी) लागला. शिवसेनेत (shivsena) फूट पडल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्यांचे काय होईल, याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते. (Grampanchayat Election Result news update)
ही निवडणूक शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीसाठी फार महत्त्वाची होती. पण बाळासाहेबांनी शिवसेना आणि भाजपने (bjp) महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला.
या निवडणूकीत भाजप हा राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला. तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेनेलाही जनतेने कौल देत विजय मिळवून दिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी, अन्य पक्ष तिसऱ्या क्रमांकावर, चौथ्या क्रमांकावर काँग्रेस, पाचव्या क्रमांकावर शिंदे गट, तर सहाव्या क्रमांकावर ठाकरे गटाला समाधान मानावे लागले. मराठवाडा, विदर्भ, कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपने सरशी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना ठाण्यात भाजपकडून धक्का
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे वर्चस्व पाहायला मिळाले. ठाणे जिल्ह्यात 20 ठिकाणी भाजपाचे पॅनल निवडून आले आहे. थेट सरपंच पदासाठी 34 ग्रामपंचायतीमध्ये 114 उमेदवारांसह 219 सदस्यांच्या जागांसाठी 613 उमेदवारांच्या अंतिम निकालात भाजपाचे वर्चस्व राहिले आहे.
आमची सरसी
"आमच्या युतीला दणदणीत विजय मिळाला आहे. राज्यात 3 हजार 29 ग्रामपंचायती आमच्या आल्यात आहेत. विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आमची सरसी झाली आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर दिली.
राज्यातील ग्रामपंचायत निकाल
१) भाजप – 2309
2) राष्ट्रवादी काँग्रेस – 1509
3) इतर – 1263
4) काँग्रेस – 961
5) शिंदे गट – 800
6) ठाकरे गट – 703
पुणे जिल्ह्याचा निकाल – 221
भाजप – 33, राष्ट्रवादी – 105, काँग्रेस – 44, ठाकरे गट – 15, शिंदे गट – 15
रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल – 222
ठाकरे गट – 101, शिंदे गट – 45, भाजप – 17 , राष्ट्रवादी – 08, काँग्रेस – 03,
धुळे जिल्ह्याचा निकाल – 128
भाजप – 52 , राष्ट्रवादी – 03, काँग्रेस – 29 ठाकरे गट – 07, शिंदे गट – 31
अहमदनगर : एकूण ग्रामपंचायत – 203
बिनविरोध : 13 भाजप – 74, राष्ट्रवादी – 68, काँग्रेस – 27, ठाकरे गट – 19, शिंदे गट – 1, इतर – 14
वर्धा जिल्ह्याचा निकाल – 113
भाजप – 51, राष्ट्रवादी – 03, काँग्रेस – 40, ठाकरे गट – 01
जळगाव जिल्ह्याचा निकाल – 140
भाजप – 43 , राष्ट्रवादी – 32, काँग्रेस – 16, ठाकरे गट – 13, शिंदे गट – 27
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल – 325
भाजप – 182, ठाकरे गट -76, शिंदे गट – 24, राष्ट्रवादी – 01
लातूर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक
बिनविरोध: 16 सर्वपक्षीय: भाजप -153, काँग्रेस -73, राष्ट्रवादी – 42
ठाकरे गट – 16, शिंदे गट – 03, मनसे – 03, इतर – 42, सरपंच पद रिक्त – 03
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.