Grampanchayat Election Result : कऱ्हाड उत्तरला बाळासाहेबच, दक्षिणेत पृथ्वीराजबाबा, उंडाळकर, अतुल भोसलेंना संमिश्र य़श

Karad कराड उत्तर व दक्षिणेत राष्ट्रवादीचेच ग्रामपंचायतींवर वर्चस्व राहिले असून भाजप व काँग्रेसला संमिश्र यश मिळाले आहे
Balasaheb Patil, Prithviraj chavan, Atul Bhosale
Balasaheb Patil, Prithviraj chavan, Atul Bhosalesarkarnama
Published on
Updated on

कऱ्हाड ः कऱ्हाड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी आज येथे झाली. त्यात किवळ, आटके, पाडळी-हेळगाव, तळबीड, सुपने, जुने कवठे, वडगाव हवेली, कोरेगाव, आणे या ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. या निवडणुकीत कऱ्हाड उत्तरमध्ये माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांची सत्ता कायम राहिली आहे तर दक्षिमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, भाजपच्या अतुल भोसले यांच्या गटाला संमीश्र यश मिळाले आहे.

कऱ्हाड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसलीदार विजय पवार यांच्या उपस्थितीत आज सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. निवडणुक शाखेचे युवराज पाटील, विनायक पाटील व मंडल अधिकारी यांनी मतमोजणीसंदर्भातील सुचना दिल्या. कवठे ग्रामपंचायतीत 20 वर्षानंतर सत्तांतर घडवत काँग्रेसने बाजी मारली. आमदार पृथ्वीराज चव्हाण व उंडाळकर गटाच्या नेतृत्वाखालील श्री जोतिर्लिंग ग्रामविकास पॅनेलनने सरपंचपदासह सात जागेवर विजय मिळवला.

सह्याद्रि कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील व सुनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील सह्याद्रि ग्रामविकास पॅनेलला केवळ तीन जागेवर समाधान मानावे लागले. कोरेगाव ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून तेथे आमदार बाळासाहेब पाटील व डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलला विजय झाला. पाडळी-हेळगाव ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन तानाजीराव जाधव व अरविंद जाधव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलने सरपंच पदासह 9 जागा मिळवल्या.

Balasaheb Patil, Prithviraj chavan, Atul Bhosale
Karad : महापुरुषांबाबत उदयनराजेंच्या भूमिकेचे शरद पवारांकडून कौतूक; राज्य, केंद्रावर टीका

तळबीड ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन तेथे उमेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने सर्व 14 जागा जिकल्याने काँग्रेसची सत्ता आली आहे. अंतवडीत राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली. कुसूर ग्रामपंचायतीत अतुल भोसले व अ‍ॅड. उंडाळकर गटाने सर्व दहा जागांवर विजय मिळवुन सत्ता कायम राखली. जुळेवाडी ग्रामपंचायतीत (कै) डी. एस. सोमदे पॅनेलने सरपंचपदासह 12 पैकी 11 जागा मिळवत सत्ता कायम ठेवली. पश्‍चिम सुपने ग्रामपंचायतीत उंडाळकर गटाच्या रयत पॅनेलला चार तर राष्ट्रवादीला सरपंचपदासह तीन जागा मिळाल्या.

Balasaheb Patil, Prithviraj chavan, Atul Bhosale
Karad News: यशवंतरावांच्या नावाचा पुरस्कार हे माझे भाग्यच : श्रीनिवास पाटील

आणे ग्रामपंचायतीत भाजपचे अतुल भोसले गटाने सरपंचपदासह सहा जागा मिळवत सत्तांतर घडवले, तर महाविकास आघाडीला तीन जागांवर समाधान मानावे लागले. हिंगनोळे ग्रामपंचायतीत कॉँग्रेसची सत्ता कायम राहिली असून काँग्रेसला सरपंचपदासह पाच जागा मिळाल्या. राष्ट्रवादीचीही सदस्य संख्या पाच झाली आहे. डेळेवाडीत राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली असून सरपंचपद रिक्त आहे. कासारशिरंबेत आमदार चव्हाण व अ‍ॅड. उंडाळकर गटाने सरपंच पदासह सहा जागांवर विजय मिळवत सत्ता कायम ठेवली.

Balasaheb Patil, Prithviraj chavan, Atul Bhosale
Satara News: उदयनराजे म्हणतात, चोरी करणाऱ्यांची बोटे छाटा.. बलात्काऱ्यांचे...

रेठरे खुर्द या भोसलेंच्या हक्काच्या ग्रामपंचायतीत आमदार चव्हाण, स्वाभिमानीचे अध्यक्ष राजु शेट्टी यांच्या गटाच्या सरपंच पदासह दोन जागा जिंकल्या तर राष्ट्रवादीचे अविनाश मोहिते गटाने सहा जागा जिंकल्या. अतुल भोसले गटाला तीन जागावरच समाधान मानावे लागले. मनव ग्रामपंचायतीत सरपंचपदासह सात जागा मिळवत उंडाळकर गटाने सत्ता कायम ठेवली. विजयनगर ग्रामपंचायतीत माजी आमदार आनंदराव पाटील यांची सत्ता कायम राहिली.

Balasaheb Patil, Prithviraj chavan, Atul Bhosale
''...तरीही ग्रामपंचायत निकालात भाजपच नंबर एकचा पक्ष राहणार!'' फडणवीसांचा आत्मविश्वास

ओंडोशीत सत्ता उंडाळकरांची तर सरपंचपद भोसले गटाकडे अशी स्थिती झाली आहे. दुशेरे ग्रामपंचायतीत भाजपाने सत्ता कायम राखली. कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने तेथे सहा जागा जिंकल्या तर काँग्रेसला केवळ तीनय जागा मिळाल्या. वनवासमाचीत अ‍ॅड. उंडाळकर व भोसले यांच्या गटाची सत्ता आली. कालगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी सत्ता कायम राहिली. शामगाव ग्रामपचांयतीत तिरंगी लढत झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चार, भाजपला तीन आणि काँग्रेसला दोन असे संमिश्र यश मिळाले.

Balasaheb Patil, Prithviraj chavan, Atul Bhosale
Elections : मुख्यमंत्र्यांची सूचना अन्‌ प्रचार संपण्याआधी काही मिनिटे पोहचून शंभूराज देसाईंनी ठोकले भाषण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com