CM Eknath Shinde Holi Celebrtion
CM Eknath Shinde Holi Celebrtion  Sarkarnama
मुंबई

CM Eknath Shinde : नातवाने हट्ट केला.. मग काय आजोबा मुख्यमंत्री निघाले हट्ट पूर्ण करायला

सरकारनामा ब्युरो

CM Eknath Shinde : आजोबा आणि नातवाचं नातं वेगळचं मानलं जातं. नातवाच्या रुपात आजोबा आपलं बालपण जगत असतात असं म्हणतात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आणि त्यांच्या नातवाचं नातंही असंच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या नातवासोबतचे क्षण कायम राज्याची जनता पाहत असते. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीच्या वेळीही त्यांचं हे नातं राज्याच्या जनतेपासून लपून राहिल नाही. असाच त्यांच्या आपल्या नातवासोबतचा एक किस्सा सध्या व्हायरल होत आहे. (Grandfather Chief Minister Eknath Shinde reached the grocery store directly to fulfill his granddaughter's desire)

आपल्या नातवाचा हट्ट पुर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट किराणा दुकान गाठलं आणि नातवला चेंडू घेऊन दिला. त्याचं काय झालं, एकनाथ शिंदे ठाण्यातल्या ज्या किसननगरमध्ये लहानाचे मोठे झाले तिथे होळीच्या निमित्ताने कुटूंबियांसोबत गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत नातू रुंद्राश हादेखील होता. होळी दहन झाल्यानंतर रुंद्राशने आजोबांकडे दुकानातून काही तरी घेऊन देण्याचा हट्ट धरला.

नातवाने हट्ट करताच आजोबाही लगेच त्याला दुकानात घेऊन गेले. आता आपल्या दुकानात थेट राज्याचे मुख्यमंत्रीच आल्याचे पाहून दुकानदारही पूर्ण भारावून गेला होता. एकनाथ शिंदेंनी रुद्रांशला चेंडू घेऊन दिला. तितक्यात त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदेही तिथे पोहोचले. त्यांनी पैसे काढून दुकानदाराला दिले.

दरम्यान होळीनिमित्त एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. ट्विट करत त्यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळीचा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सर्व नागरिक उत्साहात साजरी करत असतात. तमाम महाराष्ट्रातील जनतेला होळीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातील संपूर्ण दुःख या होळीमध्ये जळून खाक होऊ द्या, महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये सुख-समृद्धी आणि आनंद भरभरून वाहू द्या हीच इच्छा व्यक्त करतो. सुखाचे समृद्धीचे आणि आनंदाचे रंग तमाम महाराष्ट्रातील नागरिकांच्या चरणी येवोत, अशी प्रार्थना करतो, अशा शुभेच्छाही मुख्यमंत्र्यांनी दिल्यात.

''जनतेच्या जीवनामध्ये विविध रंग उधळू द्या, हीच इच्छा मी व्यक्त करतो. सुखाचे समृद्धीचे आणि आनंदाचे रंग तमाम महाराष्ट्रातील नागरिकांच्या चरणी येऊ हीच प्रार्थना करतो. धुळवड यामध्ये संपूर्ण जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन धुळवड साजरी करतात. पर्यावरणपूर्वक होळी साजरी करावी असं आव्हान मी महाराष्ट्रातील जनतेला करतो. रासायनिक रंग न वापरता नैसर्गिक रंग वापरावे पर्यावरण पूरक ही ओळी संपूर्ण नागरिकांनी साजरी करावी, असं आवाहनही मुख्यमंत्री शिंदेंनी केलं.

तसेच, 'जिथे तिथे शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे तिथे तिथे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील. शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. शेवटी शेतकरी आपला अन्नदाता आहे' अशा शुभेच्छाही मुख्यमंत्र्यांनी दिल्यात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT