Pune News : ...अखेर पीएमपीच्या कंत्राटदारांचा संप मिटला, प्रवाशांना मोठा दिलासा

PMP Strike : पीएमपीची बससेवा पूर्ववत व्हावी याकरिता विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांची भेट घेतली होती.
PMP Latest news  
Punekar news
PMP Latest news Punekar newsSarkarnama

PMPML Strike News : पीएमपीच्या चार कंत्राटदारांचे चार महिन्यांचे ९९ कोटी रुपयांचे बिल थकल्याने रविवारी(दि.५) दुपारपासून त्यांनी संप सुरु केला होता. संपात सुमारे ९०७ बस सहभागी झाल्याने रविवारी व सोमावरी मोठ्या प्रमाणात पीएमपीची प्रवासी सेवा मोठ्या प्रमाणात कोलमडली होती. त्याचा मोठा फटका पीएमपी प्रवाशांना बसला होता. मात्र, पीएमपीच्या कंत्राटदारांचा संप मिटला असून आज(दि.७)पासून पीएमपीची बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.संप मिटल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पीएमपीच्या थकीत बिलापोटी ६६ कोटी मिळाल्यानंतर पीएमपीच्या चार कंत्राटदाराने सोमवारी रात्री अखेर संप मागे घेतला.दोन दिवस चाललेल्या संपात सुमारे आठ लाख प्रवाशांना फटका बसला.उर्वरित रक्कम देखील लवकरच दिली जाणार आहे.

PMP Latest news  
Punekar news
Politics : 2024 ला उद्धव ठाकरे विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदासाठीचा चेहरा असतील का?; राऊतांनी स्पष्ट सांगितलं..

पीएमपी(PMP)ची बस सेवा पूर्ववत व्हावी याकरिता सोमवारी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पीएमपीचे अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांची भेट घेऊन चर्चा केली. यात आमदार रवींद्र धंगेकर, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांचे शिष्ट मंडळ, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप प्रवक्ते प्रदीप देशमुख , संतोष नांगरे आदीनी देखील भेट घेऊन संपावर तोडगा काढण्याची मागणी केली होती.

पीएमपीच्या चार कंत्राटदारांचे चार महिन्यांचे ९९ कोटी रुपयांचे बिल थकल्याने रविवारी दुपारपासून त्यांनी संप सुरु केला. संपात सुमारे ९०७ बस सहभागी झाल्याने रविवारी व सोमवारी मोठ्या प्रमाणात पीएमपीची प्रवासी सेवा बाधित झाली होती. सोमवारी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेने ९० कोटी रुपये पीएमपी प्रशासनाला दिले.

PMP Latest news  
Punekar news
Ashwini Jagtap : शपथविधीपुर्वीच आमदार अश्विनी जगताप लागल्या कामाला; ...तर मी पुन्हा येईन म्हणत डॉक्टरांना इशारा

यात पुणे महापालिकेने ५४ कोटी तर पिंपरी चिंचवड महापालिकेने ३६ कोटी रुपये दिले.त्यापैकी कंत्राटदारांचे ६६ कोटी रुपये देण्यात आले. तर २४ कोटी रुपये हे' एमएनजीएल' चे देण्यात येणार आहे. कंत्राटदारांचे नोव्हेंबर ते फेब्रुवारी असे चार महिन्यांचे बिल थकले होते. पैकी नोव्हेंबर ते जानेवारी असे तीन महिन्यांचे बिल सोमवारी देण्यात आले. संपात ओलेक्ट्रा, ट्रॅव्हल टाइम, अँथनी व हंसा या चार कंत्राटदारांनी सहभाग नोंदविला होता.

पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया म्हणाले, वेतन थकल्याने चार कंत्राटदारांनी संप केला होता. सोमवारी थकीत रकमेतील ६६ कोटी रुपये देण्यात आले. आता बससेवा पूर्ववत होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com